Gold rates in pakistan are higher than India
पाकिस्तानातील सोन्याचा भाव बघुन तुम्हाला बसेल धक्का! म्हणाल... इतका फरक? By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 7:23 PM1 / 10भारतातील सोन्याचा दर तुम्हाला माहिती आहे. भारतातील सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत राहतात. सध्या सोन्याचे दर आता विक्रमी पातळीच्या खाली आहेत.2 / 10पण, भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये सोन्याचे दर खूप जास्त आहेत. तेथे एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात. 3 / 10आपण पाहुयात सोन्याचे कॅरेटनुसार दर काय आहेत...4 / 10पाकिस्तानमध्येही सोन्याचे दर कॅरेटच्या आधारे निश्चित केले जातात, ज्यामध्ये २४ कॅरेट, २२ कॅरेट, २१ कॅरेट, १८ कॅरेटचा समावेश आहे.5 / 10पाकिस्तानमध्ये सोन्याचे दर तोळा, प्रति ग्रॅम आणि 10 ग्रॅमच्या आधारे निश्चित केले जातात. येथे १० ग्रॅम वजन नाही, कारण एक तोळ्याचा दर १० ग्रॅम सोन्यापेक्षा जास्त आहे. 36 / 10त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याच्या एक ग्रॅमची किंमत ९९४५ रुपये आणि २२ कॅरेट सोन्याच्या एक ग्रॅमची किंमत ९११६ रुपये आहे.7 / 10भारताचा एक रुपया म्हणजे पाकिस्तानी २.२९ रुपयांच्या बरोबरीचा आहे.8 / 10पाकिस्तानवर कर्जाचा बोझा वाढतच आहे. त्याचा परिणामही सोन्याच्या किंमतींवर होताना दिसतो आहे.9 / 10२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापारसंबंधी तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानच्या बाजारात याचा चांगलाच परिणाम पाहायला मिळाला होता.10 / 10उपासमार, महागाई आणि गरिबीने पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. पाकिस्तानमध्ये भाज्या, पेट्रोल-डिझेलनंतर आता सोन्याच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications