‘Golden’ Hotel; not only Doors and windows, even the toilet is gold! Daily cost only ...
'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा... By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 4:14 PM1 / 10कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या जगभरातील पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला. कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडक नियमावलीमुळे पुढील काही काळ तरी जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता कमीच आहे.2 / 10मात्र अशा परिस्थितीत एका ठिकाणी चक्क सोन्याचं हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्ही सोन्याच्या कपमध्ये कॉफी पिऊ शकता तर सोनेरी बाथटबमध्ये आंघोळ करू शकता. 3 / 10डॉल्चे हनोई गोल्डन लेक असं या हॉटेलचं नाव आहे. संपूर्णपणे सोन्यानं मढवलेलं हॉटेल व्हिएटनाम येथे उघडलं आहे. या हॉटेलमध्ये राहण्याचा प्रतिदिन खर्च केवळ २५० डॉलर इतका आहे. जाणून घेऊयात या हॉटेलच्या वैशिष्ट्यांविषयी.4 / 10या हॉटेलमध्ये गेल्यावर कुठल्याही मध्ययुगीन शाही राजदरबारात गेल्याचा भास होतो. या हॉटेलमध्ये गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनी चेक इन करावं, अशी हॉटेलचे मालक असलेल्या हो बिन समुहाचे चेअरमन गुयेन हू डुओन्ग यांनी इच्छा व्यक्त केली. 5 / 10पंचवीस मजले उंच असलेल्या या हॉटेलला भिंतींपासून छपरांपर्यंत सर्वत्र सोन्याच्या पत्र्यांनी मढवण्यात आलेले आहे. तसेच या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भोजनामध्येसुद्धा एक रहस्यमय सोनेरी पदार्थ मिसळलेला असू शकतो, असा दावा हॉटेलच्या मालकांनी केला आहे.6 / 10सोनेरी भिंती आणि सोनेरी छप्पराप्रमाणेच हॉटेलमध्ये असलेल्या पायऱ्यासुद्धा सोनेरी मुलामा दिलेल्या आहेत. 7 / 10इतर वस्तूंप्रमाणेच येथे बाथरूमचीसुद्ध शाही व्यवस्था केलेली आहे. येथील बाथटबसुद्धा सोन्याचा आहे. त्यामुळे येथे गेल्यावर ग्राहकांना आपण शाही व्यक्ती असल्याचा फिल येऊ शकतो. 8 / 10या हॉटेलमध्ये एक इंफिनिटी पूलसुद्धा आहे. तेसुद्धा गोल्ड प्लेटेड आहे. येथे बसून तुम्ही संपूर्ण शहर पाहू शकता. 9 / 10सगळीकडे सुवर्णाने मढवलेल्या या हॉटेलमधील टॉयलेट सिटसुद्धा सोन्याच्या पत्र्याने मढवलेली आहे. 10 / 10दरम्यान, स्वतःचा सोन्याचे पत्रे चढवण्याचा कारखाना असल्याने या हॉटेलच्या निर्मितीमध्ये कमी खर्च आल्याचे मालकांनी सांगितले. सध्या कोरोनाचा फटका पर्यटनाला बसत आहे. मात्र तरीही या हॉटेलचे मालक कमाईबाबत फार आशावादी आहेत. व्हिएतनामने कोरोनाविरोधात दिलेल्या लढ्याचे फार कौतुक झाले आहे. आता पुढच्या वर्षीपासून हॉटेलमधून अपेक्षित कमाई व्हायला सुरुवात होईल, अशी हॉटेल मालकांना अपेक्षा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications