शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! कोरोना लसीचे काऊंटडाऊन सुरु; 'Covishield' 42 दिवसांत मिळू शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 3:50 PM

1 / 10
ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना व्हायरसवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लसीची चाचणी शेवटच्या टप्प्यात आहे. express.co.uk मध्ये छापलेल्या एका अहवालानुसार आजपासून केवळ 42 दिवसांत म्हणजेच सहा आठवड्यात कोरोनाची लस तयार होण्याची शक्यता आहे.
2 / 10
ब्रिटन सरकारच्या सूत्राने संडे एक्स्प्रेसला सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि इंपेरिअल कॉलेज लंडनचे संशोधक कोरोना लस तयार करण्याच्या एकदम जवळ पोहोचले आहेत.
3 / 10
ब्रिटनमध्ये कोरोना लसीच्या उत्पादन सारख्या तयारीलाही वेग आला आहे. वैज्ञानिकांचा हिरवा सिग्नल मिळताच ब्रिटनच्या लोकांना कमी वेळात कोरोना लस मिळण्याची सोय केली जात आहे.
4 / 10
ब्रिटनचे मंत्री यावर काही बोलण्यास तयार नसून ते लसीच्या तयारीच्या कामाला लागले आहेत.
5 / 10
सुत्रांनी सांगितले की, सर्वात चांगल्या स्थितीत म्हणजेच 6 आठवड्यांत कोरोना लसीची चाचणी पूर्ण होऊ शकते. जर असे झाले तर ते गेम चेंजर ठरणार आहे.
6 / 10
लसीच्या तयारीशी जोडले गेलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, जर आणखी काही कालावधी लागला तरीही आम्ही म्हणू शकतो की संशोधक खूप जवळ पोहोचले आहेत. यानंतर लाखो डोसची गरज लागणार आहे, याच्या उत्पादनाची तयारी केली आहे.
7 / 10
ब्रिटेनच्या लसीच्या टास्कफोर्सच्या प्रमुख केट बिंघम यांनी सांगितले की, कोरोना लसीला घेऊन आम्ही सावध आणि आशावादी आहोत. काम करत रहावे लागणार असून घाईघाईत उत्सव करण्याचे प्रयत्न करू नयेत. ख्रिसमसच्या आधीच लसीच्या चाचणीचे निकाल हाती येणार आहेत.
8 / 10
ही लस लवकरात लवकर बाजारात येण्य़ासाठी ब्रिटन कायद्यामध्येच बदल करणार आहे. यामुळे कमीतकमी वेळात या लसीला मंजुरी दिली जाणार आहे.
9 / 10
कोणतीही लस यशस्वी झाली की तिला मंजुरी आणि लायसन मिळण्यासाठी अनेक महिने लागतात. जर कोरोनावरील लस सुरक्षा चाचणीमध्ये पास झाली तर या लसीला लगेचच मंजुरी दिली जाईल.
10 / 10
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची चाचणी अनेक देशांमध्ये केली जात आहे. यामध्ये ब्रिटनसह ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथील जवळपास 20000 लोकांवर चाचणी सुरु आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या