शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतातील नव्या डिजिटल नियमांवर स्पष्टच मत मांडले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 2:10 PM

1 / 6
भारत सरकारने लागू केलेल्या नव्या डिजिटल नियमांबाबत अनेक कंपन्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र काही कंपन्यांनी आपण हे डिजिटल नियम मान्य करणार असल्याचे आणि सरकार जे सांगेल त्याचे पालन करणार असल्याचे सांगितले. मात्र व्हॉट्सअॅपबाबत मात्र अद्यापही संभ्रमाची परिस्थिती कायम आहे.
2 / 6
दरम्यान, गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताच्या नव्या डिजिटल नियमांबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितले की, कंपनी लेजिस्लेटिव्ह प्रोसेसवर विश्वास ठेवते. तसेच जिथे गरज असते तिथे पुशबॅकसुद्धा करते.
3 / 6
गुगल स्थानिक नियमांप्रमाणे काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच नव्या रेग्युलेटर फ्रेमवर्कचे पालन करण्यासाठी सरकारसोबत मिळून काम करणार आहे. मात्र या नियमांचा सर्वाधिक परिणाण व्हॉट्सअॅप युझर्सच्या प्रायव्हसीवर पडणार आहे. गुगलसोबत अशी काही समस्या नाही आहे. कारण गुगलचा मेसेंजर प्लॅटफॉर्म नाही आहे. तसेच गुगलला मेसेज ट्रेस करण्यासही सांगण्यात आलेले नाही.
4 / 6
सुंदर पिचाई यांनी सांगितले की, आम्ही नेहमीच प्रत्येक देशाच्या स्थानिक नियमांचे पालन करतो. तसेच आमच्याकडे क्लिअर ट्रान्सपरेंसी रिपोर्ट्स आहे. आम्ही जेव्हा गरज भासते तेव्हा सरकारकडून करण्यात येणाऱ्या विनंतीचा मान राखतो. दरम्यान, गुगलप्रमाणेच फेसबुक आणि ट्विटरसारख्या कंपन्यासुद्धा या नियमाचे पालन करणार आहेत. व्हॉट्सअॅपसुद्धा ट्विटरचेच आहे. मात्र तिथे एंड टू एंड एन्क्रिप्शनचा पेच आहे.
5 / 6
सुंदर पिचाई यांनी हेसुद्धा सांगितले की, फ्री आणि ओपन इंटरनेट फाऊंडेशनल आहे आणि भारतामध्ये हा जुना ट्रेडिशन आहे. कंपनी म्हणून फ्री आणि ओपन इंटरनेटचे मूल्य केले पाहिजे असे कंपनी म्हणून आमचे स्पष्ट मत आहे.
6 / 6
एकंदरीच सुंदर पिचाई यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, भारतातील डिजिटल नियमांचे पालन केले जाईल. कंपनीने सांगितले की, अन्य देशांमध्येही ते त्या देशातील स्थानिक नियमांना, कायद्यांना अनुसरून काम करतात.
टॅग्स :Sundar Pichaiसुंदर पिचईgoogleगुगलCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत