Great success for AstraZeneca! medicine were also discovered on corona
अॅस्ट्राझिनेकाला मोठे यश! लस तर बनवलीच, पण कोरोनावर औषधही शोधले By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 8:16 PM1 / 10कोरोना लसीच्या चाचण्यांमध्ये यश आल्यानंतर ब्रिटनची औषध निर्माता कंपनी अॅस्ट्राझिनेकाने नवीन औषधही शोधले आहेत. हे औषध कोरोना संक्रमित लोकांना गंभीर होण्यापासून वाचविणार आहे. 2 / 10ही एक विशिष्ट अँटीबॉडी आहे, जी कोरोना लस ज्यांना मिळू शकली नाही किंवा काही कारणांनी ते टोचून घेऊन शकत नाहीत अशा लोकांसाठी वरदान ठरणार आहे. 3 / 10नवीन अँटीबॉडीची चाचणी सुरु झाली आहे. ही या प्रकारची पहिली चाचणी आहे. बीबीसीने याचे वृत्त दिले आहे. 4 / 10सुरुवातीला 10 लोकांना ही अँटीबॉडी देण्यात आली आहे. हे 10 लोक असे आहेत जे कोणत्या ना कोणत्या कारणाने कोरोना संक्रमित व्य़क्तीच्या संपर्कात आले होते. हे औषध कोरोनापासून इमरजन्सी संरक्षण असल्याचे सांगितले जात आहे. 5 / 10अॅस्ट्राझिनेका ही तीच कंपनी आहे जिने ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून कोरोनावर लस बनविली आहे. या लसीचे उत्पादन पुण्याची सीरम इन्सि्टट्यूट करत आहे. 6 / 10अॅस्ट्राझिनेकाचे हे नवीन औषध ब्रिटन सरकारचे विद्यापीठ कॉलेज ऑफ लंडन हॉस्पिटल (UCLH) वापरू लागले आहे. 7 / 10या चाचणीवेळी दोन प्रकारच्या अँटीबॉडी वापरल्याने कोरोनापासून अधिक सुरक्षा मिळू शकते का, यावर संशोधन केले जाणार आहे. 8 / 10लस टोचल्यानंतर शरीरात पूर्णपणे इम्यूनिटी विकसित होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो. यामुळे एखादा व्यक्ती संक्रमित झालेला असेल तर त्याला तातडीने सुरक्षा मिळणे गरजेचे आहे. लसीमुळे हे शक्य नाही. यामुळे औषध यासाठी खूप मोलाचे आहे. 9 / 10अॅस्ट्राझिनेकाचे हे नवीन औषध कोरोना व्हायरसला लगेचच न्यूट्रलाईज करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे औषध घेतलेला व्यक्ती १ वर्ष कोरोनापासून सुरक्षित राहू शकणार आहे. 10 / 10UCLH चे व्हायरोलॉजिस्ट केथरीन हूलिहान यांनी सांगितले की, चाचणीमध्ये 1000 लोकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठी ते नुकतेच कोरोना पॉझिटीव्हच्य संपर्कात आलेले त्यांचे मित्र, नातेवाईक असायला हवेत. आणखी वाचा Subscribe to Notifications