शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धोक्याची घंटा! 600 बिलियन टनचा ग्लेशिअर तुटला, जगभरात वाढली समुद्रातील पाण्याची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 4:01 PM

1 / 13
जगभरात समुद्रातील पाण्याची पातळी वाढत असून हे धोकादायक आहे. जगभरात आपल्या थंडीसाठी आणि बर्फासाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्रीनलॅंड देशात 600 बिलियन टनाचा बर्फ तुटून समुद्रात जाऊन सामावला. त्यामुळे संपूर्ण जगात समुद्रातील पाण्याची पातळी वाढली आहे.
2 / 13
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, 600 बिलियन टन म्हणजे किती? तर 600 बिलियन टन म्हणजे 544, 310, 844, 000, 000 किलोग्रॅम बर्फ. इतका बर्फ उन्हाळ्यात केवळ दोन महिन्यात वितळला होता.
3 / 13
त्यामुळे जगभरातील समुद्रातील पाण्याचा स्तर दोन मिलीमीटरने वाढला. हा रिपोर्ट अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा आणि जर्मनीच्या एअरोस्पेस सेंटरने दिला आहे.
4 / 13
ग्रीनलॅंडमध्ये वितळणाऱ्या बर्फाचा अभ्यास करणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील वैज्ञानिक इसाबेला वेलिकोना यांनी सांगितले की, आता येऊन गेलेला उन्हाळा हा इतर वर्षातील उन्हाळ्यापेक्षा अधिक उष्ण होता. त्यामुळे बर्फाच्या चादरी वितळल्या.
5 / 13
इसाबेला यांनी सांगितले की, ग्रीनलॅंडमध्ये 2002 ते 2018 दरम्यान दर वर्षी सरासरी जेवढा बर्फ वितळतो. त्याच्या दुप्पट 2019 मध्ये वितळला आहे. इथे 2002 ते 2019 पर्यंत 4550 बिलियन टन बर्फ वितळला आहे.
6 / 13
संपूर्ण लॉस एंजेलिस शहरात वर्षभर एक बिलियन टन पाण्याचा वापर होतो. ग्रीनलॅंडमध्ये याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बर्फ वितळला. हे जगासाठी फार घातक आहे.
7 / 13
इसाबेला यांनी सांगितले की, अंटार्कटिकामध्येही बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत आहे. जर ग्रीनलॅंड आणि अंर्टाटिकातील बर्फ वेगाने वितळू लागला तर हे जगासाठी फार धोकादायक आहे.
8 / 13
इसाबेला सांगतात की, जर पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण धुव्रावर गोठलेला बर्फ वितळू लागला तर पृथ्वीच्या चारही बाजूने असलेल्या पाण्याचा स्तर वेगाने वाढू लागले आणि याला रोखणं कठिण होईल.
9 / 13
ग्रीनलॅंडमध्ये वितळत असलेल्या बर्फाचा रिपोर्ट एअरोस्पेस सेंटरच्या ग्रॅव्हिटी रिकव्हरी अॅन्ड क्लायमेट एक्सपरिमेंट सॅटेलाइटच्या मदतीने मिळाला आहे. याचं विश्लेषण नासाने केलं.
10 / 13
ग्रीनलॅंडमध्ये वितळत असलेल्या बर्फाचा रिपोर्ट एअरोस्पेस सेंटरच्या ग्रॅव्हिटी रिकव्हरी अॅन्ड क्लायमेट एक्सपरिमेंट सॅटेलाइटच्या मदतीने मिळाला आहे. याचं विश्लेषण नासाने केलं.
11 / 13
ग्रीनलॅंडमध्ये वितळत असलेल्या बर्फाचा रिपोर्ट एअरोस्पेस सेंटरच्या ग्रॅव्हिटी रिकव्हरी अॅन्ड क्लायमेट एक्सपरिमेंट सॅटेलाइटच्या मदतीने मिळाला आहे. याचं विश्लेषण नासाने केलं.
12 / 13
ग्रीनलॅंडमध्ये वितळत असलेल्या बर्फाचा रिपोर्ट एअरोस्पेस सेंटरच्या ग्रॅव्हिटी रिकव्हरी अॅन्ड क्लायमेट एक्सपरिमेंट सॅटेलाइटच्या मदतीने मिळाला आहे. याचं विश्लेषण नासाने केलं.
13 / 13
ग्रीनलॅंडमध्ये वितळत असलेल्या बर्फाचा रिपोर्ट एअरोस्पेस सेंटरच्या ग्रॅव्हिटी रिकव्हरी अॅन्ड क्लायमेट एक्सपरिमेंट सॅटेलाइटच्या मदतीने मिळाला आहे. याचं विश्लेषण नासाने केलं.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेWaterपाणी