शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नऊ वर्षांपासून ओसाड भागात एकट्यानं राहते ही व्यक्ती; पशु-पक्ष्यांनाच बनवलं मित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 9:36 PM

1 / 14
मानव आणि पशु-पक्ष्यांमध्ये जिव्हाळ्याचं नातं बऱ्याचदा पाहायला मिळतं. प्राणीसुद्धा आपल्या मालकाशी प्रामाणिक असतात. जपानमधल्या अशाच एका मनुष्याला जनावरांची प्रचंड आवड आहे.
2 / 14
विशेष म्हणजे तो जनावरांसोबत एका ओसाड ठिकाणी एकट्यानं वास्तव्य करतो. जपानमध्ये आलेल्या सुनामीमुळे आण्विक अपघात झाला आणि त्यातील काही किरणोत्सर्ग या भागात पडली. त्यामुळे इथली एक वसाहतचं नष्ट झाली.
3 / 14
त्या ठिकाणीच ही व्यक्ती जनावरांच्या सान्निध्यात वास्तव्य करत आहे. त्या ठिकाणी एखादी व्यक्ती एकट्यानं राहू शकत नाही. पण मत्सुमुरा हे तिकडे एकट्यानं वास्तव्य करतात.
4 / 14
हे क्षेत्र गेल्या नऊ वर्षांपासून ओसाड आहे. तरीही ही व्यक्ती तिथे कोणतीही भीती न बाळगता आपले आयुष्य आरामात जगत आहेत.
5 / 14
नाओटो मत्सुमुरा जपानमधील टोमिओको या छोट्या गावात राहतो. खरंतर 11 मार्च 2011ला फुकुशिमा, जपानमध्ये एक भयंकर आण्विक अपघात झाला.
6 / 14
त्यानंतर टोमियोकोसह आसपासच्या भागात राहणारे लोक आपली घरे सोडून इतर भागात स्थायिक झाले. नाओटो मत्सुमुरा यांनीही टोमिओको भाग सोडला होता
7 / 14
परंतु त्यांना राहण्यासाठी जागा न मिळाल्यास ते परत टोमियोको येथे आले. मत्सुमुरा हा फुकुशिमाच्या प्राण्यांचा रक्षक असल्याचे म्हटले जाते.
8 / 14
सुरुवातीला त्यांनी केवळ आपल्या पाळीव प्राण्यांचे पालनपोषण केले, परंतु नंतर ते सोडून गेलेल्या प्राण्यांचे पालक बनले. मत्सुमुराला 'रेडिओएक्टिव्ह मॅन' असेही म्हणतात.
9 / 14
कारण एका संशोधनानुसार, एका सामान्य माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात आलेल्या रेडिएशनपेक्षा 17 पटीनं अधिक प्रमाणात मत्सुमुराचा फटका बसला आहे.
10 / 14
यामागचे कारण असे आहे की, जेव्हा तो टोमिओकोला परतला, तेव्हा तो येथे उपस्थित भाज्या, मांस किंवा मासे खायचा, ज्यामध्ये बरेच विकिरण होते.
11 / 14
तथापि, आता ते बाहेरचे अन्न खातात. या दोन्ही गोष्टींमध्ये कोणतेही विकिरण नाही. मत्सुमुरा ज्या भागात राहतात तेथे वीज किंवा पाणी नाही.
12 / 14
त्यांच्याकडे सौर पॅनेल आहे, ज्याच्या मदतीने ते आपला मोबाइल चार्ज करतात. त्याच्यावरच ते संगणकही चालवतात. त्यांना सिगारेटचे व्यसन आहे.
13 / 14
माणसांऐवजी पशु-पक्ष्यांच्या सान्निध्यात त्यांना राहायला प्रचंड आवडते.
14 / 14
त्यांनी गायी, शहामृग, मांजरं अशी विविध पशु-पक्षी पाळले आहेत.