शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खरंच की काय? उवा मारण्याच्या "या" औषधाने कोरोना रुग्णांच्या मृत्यूत 80 टक्के घट; रिसर्चमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 3:22 PM

1 / 14
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. संशोधनातून विविध माहिती ही सातत्याने समोर येत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल आठ कोटींचा टप्पा पार केला आहे.
2 / 14
कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उवा मारण्याच्या औषधांमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूत 80 टक्के घट होऊ शकते असा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे.
3 / 14
Ivermectin असं या औषधाचं नाव असून हे औषध स्वस्त दरात उपलब्ध आहे. या औषधामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या औषधाच्या वापरामुळे रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचा खुलासा देखील रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.
4 / 14
या संशोधनात 573 रुग्णांचा समावेश करण्यात आला. त्यांना Ivermectin औषध देण्यात आलं. त्यातील फक्त आठ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे 510 जणांना हे औषध दिलेलं नव्हतं. त्यातील 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
5 / 14
एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार उवा मारण्याच्या या औषधाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत चांगले परिणाम दाखवले असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. औषधाच्या एका डोसमुळे 48 तासांमध्ये सर्व व्हायरल आरएनएचा खात्मा झाल्याचा दावा करण्यात आला होता.
6 / 14
लिव्हरपूल विद्यापीठाचे वायरोलॉजिस्ट एंड्यू हिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर उपचार शोधण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे संशोधन आहे. जवळपास 1400 रुग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनाचा डेटा सार्वजनिक करण्यात आला आहे.
7 / 14
सध्या या संशोधनाची समीक्षा सुरू आहे. तर तज्ज्ञांनी हिल यांच्या निष्कर्षाला अपरिपक्व असल्याचे म्हटलं आहे. Ivermectin या औषधाला करोनावरील प्रभावी औषध असल्याचे जाहीर करण्याआधी त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे.
8 / 14
मलेरिया व इतर औषधांना घेऊन याआधी देखील अशाच प्रकारचे काही दावे करण्यात आले होते. मात्र ते चुकीचे असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 14
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही देशामध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे.
10 / 14
काही ठिकाणी त्याचे साईड इफेक्ट्स देखील समोर आले आहेत. याच दरम्यान जर्मनीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लसीचा ओव्हरडोस दिल्यामुळे आठ जणांची प्रकृती बिघडली आहे.
11 / 14
जर्मनीच्या स्ट्रेलसँड भागात रविवारी आरोग्य कर्मचाऱ्यांना फायजर-बायोएनटेकची लस देण्यात आली होती. मात्र लसीच्या डोसचे प्रमाण हे ठरवलेल्या प्रमाणापेक्षा पाचपट अधिक होते. त्यानंतर जवळपास चार जणांमध्ये फ्लूंची लक्षणे आढळून आली.
12 / 14
काहींची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर प्रशासनाने माफी मागितली आहे. ही एक चूक असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच प्रमाणापेक्षा अधिक डोस दिल्यामुळे मोठे नुकसान होणार नसल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
13 / 14
काही दिवसांपूर्वी जर्मनीमध्ये कोरोना लसीबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. काही भागांमध्ये लस स्वीकारण्यास नकार देण्यात आला. लस योग्य तापमानात ठेवण्यात आली नसल्याच्या कारणास्तव नकार देण्यात आला होता.
14 / 14
अमेरिका, ब्रिटनमध्ये आतापर्यंत जवळपास 30 लाखांहून अधिकजणांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. लस तयार करण्यात येत असून काही ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसResearchसंशोधन