शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजकारणाचे बाळकडू! देशाच्या माजी खासदाराचा नातू अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 5:38 PM

1 / 8
भारतीय वंशाचे अमेरिकन इंजिनिअर हर्षवर्धन सिंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीचा दावा केला आहे.
2 / 8
उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार राहिलेले दिवंगत हुकुम सिंग यांची मुलगी नंदिता सिंग यांचा विवाह बुलंदशहर येथील नौनिहाल सिंग यांचा मुलगा त्रिभुवन सिंग यांच्याशी सुमारे ४० वर्षांपूर्वी झाला होता.
3 / 8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले हर्षवर्धन सिंग हे त्रिभुवन सिंग यांचे चिरंजीव आहेत.
4 / 8
दिवंगत हुकम सिंग यांची मुलगी मृगांका सिंग यांनी सांगितले की, त्यांचा पुतण्या हर्षवर्धन सिंग याने रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असू शकतात असेही त्यांनी नमूद केले.
5 / 8
हर्षवर्धन यांची मावशी असलेल्या मृगांका सिंग यांनी सांगितले की, हर्षवर्धन सिंग यांनी गुरुवारी अमेरिकेच्या फेडरल निवडणूक आयोगासमोर अधिकृतपणे आपला दावा मांडला.
6 / 8
हर्षवर्धन सिंग यांचा जन्म अमेरिकेत झाला असून त्यांचे कुटुंब न्यू जर्सीमध्ये राहते. पेशाने इंजिनिअर असलेल्या हर्षवर्धन सिंग यांनी २०१७ मध्ये अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश केला.
7 / 8
दरम्यान, हर्षवर्धन सिंग हे २०१७ आणि २०२१ मध्ये न्यू जर्सीच्या राज्यपालपदाचे दावेदार राहिले आहेत.
8 / 8
माहितीनुसार, ते २०१७ आणि २०२१ मध्ये न्यू जर्सीच्या राज्यपालपदासाठी रिपब्लिकन प्रायमरीमध्ये, २०१८ मध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि २०२० मध्ये सिनेटच्या जागेसाठी, रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यात अयशस्वी झाल्याची माहिती आहे. राज्यपालपदाच्या दाव्यात हर्षवर्धन सिंग तिसऱ्या क्रमांकावर होते.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत