Hathras Gangrape : There are provisions in various countries for the punishment of rapists
या देशांमध्ये बलात्काऱ्यांना दगडाने ठेचून, भर चौकात फासावर लटकवून दिला जातो मृत्युदंड By बाळकृष्ण परब | Published: September 30, 2020 7:44 PM1 / 6उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या करण्यात आलेल्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र आता या आऱोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, भारतात बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र जगात असे काही देश आहेत जिथे बलाकाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जाते. जाणून घेऊया अशा देशांविषयी. 2 / 6 अमेरिकेच्या फेडरल लॉमध्ये रेप शब्दाऐवजी सहमतीशिवाय शरीरसंबंध हा गुन्हा मानला जातो. येथील कायद्यानुसार अमेरिका कोड (१८ यूएससी, २२४) च्या चॅप्टर १०९ ए अंतर्गत समाविष्ट आहे. येथील कायद्यानुसार या गुन्ह्यासाठी दंडात्मक कारवाईपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा दिली जाते. 3 / 6बलात्काराच्या गुन्ह्यासाठी इस्लामिक देशांमध्ये कठोरात कठोर शिक्षेची तरतूद आहे. इकामध्ये बलात्कार करणाऱ्याला मृत्युदंड दिला जातो. आरोपीला दगडांनी ठेचून या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. या शिक्षेच्या भीतीमुळे येथील लोक बलात्कारासारखा गुन्हा करण्यास घाबरतात. 4 / 6रशियामध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी ३० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. ही शिक्षा गुन्ह्याच्या गांभीर्यावरही अवलंबून असते. 5 / 6उत्तर कोरियामध्ये बलात्कारासाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. उत्तर कोरियामध्ये बलात्काऱ्याच्या डोक्यात अनेक गोळ्या झाडल्या जातात. 6 / 6संयुक्त अरब अमिरातीमध्येसुद्धा बलात्काऱ्याला थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते. संयुक्त अरब अमिरातीमधील कायद्यानुसार बलात्काऱ्याला एका आठवड्याच्या आत फाशी दिली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications