शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sexual Health: गर्लफ्रेंडवर ते एक्सपिरिमेंट करणे पडले महागात, तरुणाची सेक्स लाईफ झाली खराब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 2:00 PM

1 / 8
नात्यांमध्ये दृढता येण्यासाठी पार्टनर्समध्ये शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे संबंध भक्कम असले पाहिजेत. कधी कधी छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा नात्यांमधील दुराव्यासाठी कारणीभूत ठरतात. असाच काहीसा प्रकार या जोडप्यासोबत घडला आहे. एक एक्सपिरिमेंटच्या नादात त्याची सेक्स लाईफ कशी खराब झाली याची माहिती एका पुरुषाने दिली आहे.
2 / 8
हा पुरुष लिहितो की, पार्टनरसोबत एक एक्सपिरिमेंट करणे मला खूप महागात पडले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मी इंटिमेट होऊ शकलेलो नाही. शारीरिक संबंधांवेळी प्रत्येक वेळी मीच पुढाकार घेत असे. एके दिवशी मी विचार केला की, माझ्याकडून प्रयत्न बंद करून त्यावर माझ्या पार्टनरकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहू. मी पुढाकार न घेतल्यास माझी गर्लफ्रेंड रोमान्ससाठी स्वत: पुढाकार घेते की नाही हे मला पाहायचे होते.
3 / 8
तो म्हणाला की, हा प्रयोग करून तीन वर्षे झाली. तेव्हापासून आमच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. मी इंटिमेसीला मिस करतो. मात्र आता मी माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेऊ इच्छित नाही. तिने केवळ माझे मन राखण्यासाठी कुठलेही काम करावे, अशी माझी इच्छा नाही आहे. असे वाटते की या गोष्टीचा तिच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. त्यामुळे मीसुद्धा या गोष्टीबाबत कुठलाही उल्लेख करत नाही.
4 / 8
आपल्या मनातील द्विधावस्था या पुरुषाने ट्विटरवर फेशहोल नावाच्या अकाऊंटच्या माध्यमातून लिहिली आहे. या अकाऊंटवर १ लाख ६५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्यक्तीने त्याचे कन्फेशन मान्य करण्याची जी हिंमत दाखवली आहे, त्याची दाद देत आहेत. तर काहींनी आपणही या अवस्थेतून गेलो असल्याचे म्हटले आहे.
5 / 8
या पुरुषाची कन्फेशन पोस्ट वाचून एका युझरने लिहिले की, माझ्या विवाहाला दोन वर्षे झाली आहेत. तसेच माझीही अशीच परिस्थिती आहे. विवाहानंतर आम्ही कितीवेळा इंटिमेट झालो हे मी मोजून सांगू शकतो. स्वत: पुढाकार घेण्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग नाही.
6 / 8
या पुरुषाची कन्फेशन पोस्ट वाचून एका युझरने लिहिले की, माझ्या विवाहाला दोन वर्षे झाली आहेत. तसेच माझीही अशीच परिस्थिती आहे. विवाहानंतर आम्ही कितीवेळा इंटिमेट झालो हे मी मोजून सांगू शकतो. स्वत: पुढाकार घेण्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग नाही.
7 / 8
मात्र सोशल मीडियावर या व्यक्तीला काही लोक सल्ला देतानाही दिसत आहेत. त्यातील एकाने लिहिले की, मी सुद्धा या परिस्थितीतून गेलो आहे. तिला वाटायचे की, मी नपुंसक असल्याने मी पुढाकार घ्यायचे बंद केले आहे. तसेच त्यामुळे मी लाजिरवाणा होऊन राहतो. विश्वास ठेवा महिलांनाही फरक पडतो. केवळ तुम्ही थोडा अजून प्रयत्न करण्याची गरज आहे.
8 / 8
तर एका युझरने सल्ला दिला की, असे जीवन जगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत याबाबत खुलेपणाने बोला. तर अन्य एकाने सल्ला दिला की, तुम्ही तिला सोडून पुढे गेले पाहिजे. असे वाटते की, तिला तुमच्यामध्ये रस उरलेला नाही.
टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय