शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 6:07 PM

1 / 5
डास हा आकाराने लहान असलेला कीटक माणसासाठी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण करू शकतो. आफ्रिका खंडातील बहुतांश देश हे डास आणि त्यापासून होणाऱ्या आजारांमुळे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत डासांचा बीमोड करण्यासाठी एक हटके मार्ग अवलंबला जात आहे. पूर्व आफ्रिकेतील जिबूटी या देशात प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या लाखो डास सोडण्यात आले आहेत. डेंग्यू-मलेरियासारखे जीवघेणा आजार फैलावणाऱ्या मादी डासांना नष्ट करणे हा या मागचा हेतू आहे.
2 / 5
एका रिपोर्टनुसार हे डास ब्रिटनमधील ऑक्सिटेक कंपनीने विकसित केले आहेत. त्यांच्यामध्ये काही जनुकीय बदल करण्यात आले आहेत. हे डास माणसांना चावत नाहीत. तसेच ते कुठलाही आजारही फैलावत नाहीत. उलट हे डास माणसांना चावणाऱ्या मादी डासांचा खात्मा करतात.
3 / 5
ऑक्सिटेकने दिलेल्या माहितीनुसार जनुकीय बदल केलेले हे डास रानटी मादी डासांसोबत प्रजननाचे प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये एक खास प्रकराचे जीन असतात, जे रानटी मादी डासांना प्रजननाच्या वयापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात. तसेच प्रजननादरम्यान बहुतांस रानटी डासांचा मृत्यू होतो.
4 / 5
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जनुकीय बदल केलेले डास आणि मादी डासांच्या मीलनामधून केवळ नर डास जन्माल येतात. ते माणसांना चावत नाहीत. तसेच त्यांच्यापासून इतरही कुठला धोका राहत नाही.
5 / 5
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीस कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार सन २०१९ नंतर जगातील बहुतांश देश डासांचा सामना करण्यासाठी जनुकिय बदल केलेल्या डासांची मदत घेत आहेत. भारतामध्येही याचा अवलंब करण्यात आला आहे. तसेच तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे.
टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय