height of cruelty! China denies sacrificing dead soldiers in Galwan; Refusal of cremation
क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 3:02 PM1 / 10गेल्या महिन्यात गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर क्रूर हल्ला करणाऱ्या चीनने प्रत्युत्तरात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या अंत्यसंस्काराबाबतही क्रूरपणाच चालविला आहे. देशासाठी सैनिकांचे बलिदान नाकारत त्यांच्या जाहीर अंत्यविधीला मान्यता देण्यास तयार नसल्याचे अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेने म्हटले आहे. 2 / 10जूनच्या मध्यावर लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारतीय जवानांवर चीनच्या सैन्याने हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. 3 / 10खिळे असलेल्या लोखंडी रॉडने हल्ला केल्याने आणि पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने भारतीय जवानांना हौतात्म्य आले होते. मात्र, या हल्ल्यातून सावरत भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्यामध्ये चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेले होते. या सैनिकांना चीनने हौतात्म्याचा सन्मानही देण्यास नकार दिला आहे. 4 / 10चीनचे सरकार या मारल्या गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकत असून या जवानांची अंत्ययात्रा आणि अंत्य संस्कार करू नका, असे बजावत आहे.5 / 1015 जूनला लडाखच्या पूर्वेक़डे झालेल्या या घटनेत दोन्ही बाजुंचे नुकसान झाले होते. अनेक जवान जखमी झाले होते. भारताने आपले 20 जवान शहीद झाल्याचे खुल्यादिलाने कबुल केले होते. या जवानांना अखेरची मानवंदना देत त्यांच्या गावोगावी अंत्ययात्राही काढल्या होत्या. मात्र, हा सन्मान चीनच्या सैनिकांच्या नशीबी आलेला नाही. 6 / 10एवढेच नाही तर देशवासियांमध्ये असंतोष पसरेल म्हणून चीनने किती सैनिक मारले गेले याचा आकडाही जाहीर केलेला नाही. कम्युनिस्ट पार्टी ही जनतेसोबत क्रूर वागते, परंतू देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांबाबतही असे वागणे हीनपणाचे लक्षण मानले जात आहे. या घटनेला 1 महिना होऊन गेला आहे. 7 / 10चीनच्या सरकारकडून ज्यांनी आपले स्वकीय गमावले त्या कुटुंबांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे. एकीकडे सैनिक मारले गेलेला आकडा लपविला असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबियांना मनाई करण्यात आली आहे. 8 / 10यूएस न्यूजने त्यांच्या वृत्तामध्ये सांगितले की, अमेरिकी गुप्तचर अहवालानुसार चीन ही गोष्ट स्वीकारत नाहीय की त्यांच्या सैनिकांना भारतीय जवानांनी मारले. कारण बिजिंगची मोठी चूक लपवायची आहे. भारतीय जवानांना कमी लेखून हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला टाळता आला असता. 9 / 10चीनने दोन सैन्य अधिकाऱ्यांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे म्हटले आहे. तर चीनचे 4३ सैनिक मारले आणि गंभीररित्या जखमी आहेत. तर आणखी एका अमेरिकी गुप्तचरांनुसार चीनचे 35 सैनिक मारले गेले आहेत. 10 / 10चीनच्या नागरिक प्रकरण मंत्रालयाने गलवान घाटीमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सांगितले की, जवानांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करावेत. परंतू ते तुमच्या घरापासून खूप दूरवर करावेत. जेणेकरून यामध्ये कुटुंबाशिवाय दुसरा कोणताही व्यक्ती सहभागी होता नये. आणखी वाचा Subscribe to Notifications