शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

परदेशात जाऊन बक्कळ कमाईची नोकरी करायचीय? 'हे' आहेत जबरदस्त पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 7:41 PM

1 / 11
परदेशात नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण परदेशवारी करतात देखील. पण नेमकं कोणत्या देशांमध्ये चांगला पगार आणि व्यवसाय सुरू करता येऊ शकतो? अशा १० देशांची माहिती आपण जाणून घेऊयात...
2 / 11
मध्य युरोपातील ऑस्ट्रिया एक छोटा देश आहे. पण गुणवत्तापूर्ण जीवनशैलीमध्ये या देशाचा पहिला क्रमांक लागतो. तसंच सर्वात सुरक्षित देशांमध्येही ऑस्ट्रियाचं नाव घेतलं जातं. याशिवाय ऑस्ट्रियामध्ये सरासरी वेतन देखील इतर देशांच्या तुलनेत खूप चांगलं आहे. इथं काम करणाऱ्या सर्वसाधाकरण कर्मचाऱ्याला वर्षाला सरासरी ५० हजार डॉलर म्हणजेच जवळपास ३६ लाख रुपयांचं वेतन मिळतं.
3 / 11
नॉर्वेची ओळख तिथल्या सुंदर निसर्गामुळे होते. जगातील सर्वात स्वच्छ परिसर म्हणून नॉर्वेला मान दिला जातो. तसंच जगातील सर्वाधिक मानधन देणाऱ्या देशांमध्येही नॉर्वेचा समावेश आहे. नॉर्वेमध्ये एका कर्मचाऱ्याला सरासरी वार्षिक वेतन जवळपास ३७ लाख रुपये इतकं मिळतं. नॉर्वेमध्ये तेलाचा पुरेपूर साठा आहे त्यामुळे देशाला आर्थिक चालना मिळाली आहे.
4 / 11
यूरोपातील बेल्जियममध्ये तीन अधिकृत भाषा बोलल्या जातात. यात फ्लेमिश डच, फ्रेंच आणि जर्मन भाषेचा समावेश आहे. दुसरीकडे कार्यालयीन कामकाजात इंग्रजी बोलली जाते. बेल्जियममध्ये वेतन देखील खूप चांगलं आहे. येथे सरासरी वार्षिक वेतन ३८ लाख रुपये इतकं आहे.
5 / 11
ऑस्ट्रेलियाची ओळख सुंदर समुद्र किनाऱ्यांसोबत आर्थिक भरभराटीसाठी देखील केली जाते. देशातील आर्थिक नियमांमध्ये काटेकोर पद्धतीनं पालन केलं जातं. खासकरुन ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊन इथं काम करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. ऑस्ट्रेलियात कर्मचाऱ्यांना सरासरी वार्षिक वेतन जवळपास ३९ लाख रुपये इतकं आहे.
6 / 11
यूरोपातील नेदरलँड देखील आणखी एक असा देश आहे की जिथं तुम्ही चांगली कमाई करू शकता. नेदरलँडमध्ये सरासरी वार्षिक वेतन जवळपास ४० लाख रुपये इतकं आहे. चांगल्या वेतनासह नेदरलँडमध्ये वाहतूक सुविधा देखील खूप चांगली आहे.
7 / 11
डेन्मार्कमधील स्कँडिनेविया देशातील जीवनशैली अव्वल दर्जाची आहे. या देशातील सरासरी वार्षिक वेतन ४१ लाख रुपये इतकं आहे. जगातील सर्वात सुखसंपन्न देशांमध्ये डेन्मार्कचा समावेश होतो. जगात व्यापार करण्यासाठी डेन्मार्क सर्वात उपयुक्त देश ठरतो.
8 / 11
अमेरिका महासत्ता म्हणून ओळखली जाते. त्यासोबतच इथलं सरासरी वार्षिक वेतन देखील खूप चांगलं आहे. देशातील सरासरी वार्षिक वेतन तब्बल ४६ लाख रुपये इतकं आहे. चांगल्या वेतनासोबतच अमेरिकेतील जीवनशैली देखील उत्तम आहे.
9 / 11
स्वित्झर्लंड हा यूरोपमधील एक छोटा आणि चारही बाजूंनी जमिनीनं व्यापलेला देश आहे. युरोपियन युनिअनमध्ये समाविष्ट असूनही या देशाचं स्वत:चं चलन आहे. देशात एक सक्षम बँकिंग प्रणाली आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरासरी वार्षिक वेतन ४५ लाख रुपये इतकं आहे.
10 / 11
पश्चिम युरोपात एक छोटा देश आहे. त्याचं नाव आहे लक्झमबर्ग. या देशाच्या सीमा बेल्जियम, फ्रान्स आणि जर्मनीला चिटकून आहेत. देशाची लोकसंख्या केवळ ६ लाख इतकी आहे आणि इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्कळ वेतन मिळतं. लक्झमबर्ग येथे सरासरी वार्षिक वेतन ४८ लाख रुपये इतकं आहे.
11 / 11
आइसलँड जगातील सर्वात उत्तर भागातील देशांपैकी एक देश आहे. देशात सरासरी वार्षिक वेतन ४९ लाख इतकं आहे. देशाची लोकसंख्या केवळ ३.५ लाख इतकी आहे. त्यामुळे इथं लोकांना गर्दी आणि इतर समस्यांना देखील सामोरं जावं लागत नाही.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयUSअमेरिकाAustraliaआॅस्ट्रेलिया