ट्रम्प की बायडन?; 1984 पासून अचूक भाकित वर्तवणाऱ्याने सांगितलं कोण जिंकणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 15:17 IST
1 / 10अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या भविष्यवाणी मॉडेल्सचे आजोबा म्हणून ओळखल्या जाणार्या इतिहासकाराने म्हटले आहे की, २०२०च्या राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडन जिंकतील.2 / 10अमेरिकन युनिव्हर्सिटीचे इतिहासकार अॅलन लिचमन यांच्या अंदाजाकडे लक्ष देणे योग्य आहे, कारण त्यांनी १९८४ पासूनच्या प्रत्येक निवडणुकांचा अचूक अंदाज वर्तविला आहे. 3 / 10ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यावर मात केली होती. यासंदर्भातही त्यांनी अंदाज वर्तविला होता.4 / 10बुधवारी प्रकाशित झालेल्या न्यूयॉर्क टाइम्समधील एका ऑप-एड व्हिडिओमध्ये अॅलन लिचमन मॉडेलने नेहमीप्रमाणे व्हाईट हाऊस संदर्भात 13 निकष सांगितले आहेत. ज्यामुळे आता बायडन 3 नोव्हेंबरला विजय मिळविण्याच्या आघाडीवर आहेत, असा अंदाज आहे.5 / 10यावेळी, अॅलन लिचमन यांच्या आधीच्या अंदाजानुसार, राष्ट्रीय सर्वेक्षणांवरून असे दिसून येते की, बायडन पर्यायी नेतृत्व करत असल्याचे संकेत मिळत आहेत.6 / 10रिअल क्लीयर पॉलिटिक्सद्वारे केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षण सरासरीनुसार, बायडन यांना 49.4 टक्के मतदान, तर ट्रम्प यांना 42.4 टक्के मतदान आहे. बायडन यांचे ट्रम्प यांच्यापेक्षा सात टक्के जास्त आहे.7 / 10लिचमन म्हणाले की, व्हाईट हाऊसमधील शर्यतीतील विजयाचे मूल्यांकन करण्यासाठी ज्या 13 खऱ्या-खोटा निकषांचा विचार केला आहे. त्यापैकी बायडन यांची सात निकषांत ट्रम्प यांच्यावर आघाडी आहे. या निकषांमध्ये अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, घोटाळे, सामाजिक अशांतता यासारख्या घटकांचा समावेश आहे. 8 / 10हे निश्चितपणे समजले पाहिजे की, मॉडेल वैज्ञानिक नाही, परंतु लिचमॅन यांचा अंदाज कसा ठरतो. हे पाहणे योग्य ठरणार आहे.9 / 10अलीकडेच, ट्रम्प ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आर्थिक आणि बाजाराच्या प्रगती विषयी बोलत आहेत, कारण नोव्हेंबरमधील विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.10 / 10कोरोना महामारीच्या काळात Nasdaq Composite Index COMP, +0.52% चा उच्च रेकॉर्ड केला आहे, तो बायडन निवडणूक जिंकल्यानंतर कोसळले, असा दावा सोमवारी ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान, शेअर बाजाराचे यश ट्रम्प यांच्या विजयासाठी पुरेसे नाही, असेही बोलले जात आहे.