honeytrap and spies greed know about the chinese spying game around the world
धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी' By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 9:55 AM1 / 14चिनी टेलिकॉम कंपनी हुवावेसंदर्भात जगभरात वाद वाढतच चालला आहे. अमेरिकेनंतर आता इंग्लंडदेखील या चिनी कंपनीशी असलेला आपला संबंध तोडण्याच्या स्थितीत आहे. या संपूर्ण वादामुळे चिनचे जगात हेरगिरी करणारे नेटवर्क, एजन्ट्सची भरती आणि जगभरात 'ड्रॅगन राज' आणण्याचा मंसुबा पुन्हा एकदा उघड झाला आहे.2 / 14इंग्लंडची गुप्तचर संस्था MI-6च्या माजी हेराने चीनच्या या अत्यंत भयानक आणि घातक कटाची पोल-खोल केली आहे.3 / 14मोठ्या कंपन्यांत कम्युनिस्ट पार्टीचे अंतर्गत 'सेल' - एमआय-6 च्या माजी हेरच्या कथित कागदपत्रांतून (Dossier) समोर आले, की चीनने हुवावेच्या समर्थनात वातावरण निर्मिती करण्यासाठी इंग्लंडमधील नेत्यांसह प्रसिद्ध लोकांना आपल्या बाजूने वळवले आहे. 4 / 14गुप्त हेराने सांगितले, की जगभरात चीनच्या सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये एक आंतर्गत 'सेल' आहे. जो चिनी कम्युनिस्ट पार्टीला उत्तरदायी आहे. 5 / 14राजकीय अजेंडा चलवणे, तसेच कंपनी राजकीय दिशानिर्देशांचे पालन कसे करेल, हे निश्चित करणे, या सेलचे काम असते. 6 / 14उद्योगाच्या नावाखाली कम्युनिस्ट पार्टी जगभरात सक्रिय - यामुळेच चीनमधील तज्ज्ञ मंडळी जोर देऊन सांगतात, की चिनी कम्युनिस्ट पार्टी इंग्लंडसह संपूर्ण जगात उद्योगाच्या नावाने सक्रिय आहे. 7 / 14एका तज्ज्ञाने 'बीबीसी'सोबत बोलाना सांगितले, 'प्रत्येक ठिकाणी पार्टीचे सदस्य आहेत. चीनसाठी उद्योग राजकारणापासून कधीही वेगळा नाही.' चिनी कम्युनिस्ट पार्टीचे 9.3 कोटी सदस्य आहेत. यापैकी अनेक जण परदेशात चिनी कंपन्यांत तैनात आहेत अथवा त्यांना गुप्तपणे तेथे ठेवण्यात आले आहे.8 / 14अमिष दाखवून परदेशी उद्योजकांची फसवणूक - तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की परदेशी कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदांवर तैनात असलेल्या या एजन्ट्सची वेगवेगळ्या पद्धतीने भर्ती केली जाते. इग्लंडच्या गुप्तहेराने दिलेल्या माहितीनुसार, या एजन्ट्सना 'सकारात्मक अमिष' दाखवून पटवले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती चिनी नसेल, तेव्हा हे विशेषत्वाने केले जाते.9 / 14यात पश्चिमेकडील देशांतील लोकांना महत्वाच्या बिझनस मिटिंगच्या नावाने चीनमध्ये येण्याचे निमंत्रण देणे, एखादी कंपनी संकटात असेल, तर तिला आर्थिक मदत करणे अथवा एखाद्याला आपल्या कंपनीत एखादे पद देणे, आदींचा समावेश होतो. 10 / 14गेल्या 10 ते 15 वर्षांत चीनने अत्यंत झपाट्याने सकारात्मक अमिष दाखवून परदेशी नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम केले आहे.11 / 14सुंदर महिलांच्या मदतीने 'हनीट्रॅप' - चीन हेरांच्या भरतीसाठी अत्यंत घाणेरड्या पद्धतीचा अवलंब करतो. यात चिनी कुटुंबांवर दबाव टाकणे, ब्लॅकमेल करणे, आदी प्रकार केले जातात. 12 / 14या हेरांच्या मदतीने चीन अज्ञात पश्चिमेकडील देशांतील उद्योजकांना हनीट्रॅपच्या माध्यमाने अडकवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी चीन सुंदर महिलांची भर्ती करतो आणि नंतर, त्यांना ट्रेनिंग देऊन निश्चित टार्गेटजवळ पाठवतो. 13 / 14या महिला टार्गेटची आक्षेपार्ह फोटो काढतात आणि व्हिडिओ तयार करतात. यानंतर उद्योजकाला हवे ते काम करण्यासाठी ब्लॅकमेल केले जाते. 14 / 14चीनमध्ये काम करणाऱ्या एका ब्रिटिश उद्योजकाने सांगितले, की चीन केवळ परदेशांतच नाही, तर आपल्या देशातही हनीट्रॅपचे खेळ खेळतो. हे सर्व चिनी गुप्तचर संस्था चालवते. चीनने संपूर्ण जगात हेरगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर नेटवर्क तयार केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications