शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' श्रीमंत देशात फक्त 83 रुपयांत घरं विकतय सरकार, लोक झाले अस्वस्थ!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: March 02, 2021 3:36 PM

1 / 10
आजकाल लोक एक-एक पैसा जोडून आपल्या स्वप्नातील घर खरेदी करतात अथवा बांधतात. मात्र, एका देशात सरकार केवळ 83 रुपयांत घरं विकत आहे.
2 / 10
हो... हे खरं आहे! इटलीमध्ये (Italy) केवळ 83 रुपये देऊन हजारो परदेशी नागरिकांनी घरं (Home) खरेदी केली आहेत. मात्र, स्थानिक लोक याला विरोध करत आहेत. स्थानिक प्रशासन आपली घरं विकत आहे, असा या नागरिकांचा आरोप आहे.
3 / 10
ही घरं इटलीतील सिसली (sicily) आयलॅन्डवर विकली जात आहेत. 14 व्या शतकात वसलेल्या या गावाचे रुपांतर आता अर्बन जंगलात झाले आहे.
4 / 10
येथील अधिकांश घरे मोडकळीस आली आहेत. यामुळेच येथील लोक गाव सोडून शहरांत गेले आहेत. यामुळे येथील घरं रिकामी झाली. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन ही घरं विकत आहे.
5 / 10
घरं विकण्याला स्थानिक लोक विरोध करत आहेत. यावर बोलताना, सिसलीचे महापौर म्हणाले, की त्यांनी या गावातील लोकसंख्या वाढविण्याचा निश्चय केला आहे. यामुळेच येथे केवळ 83 रुपयांत घर विकायला सुरुवात करण्यात आली आहे.
6 / 10
100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत घर विकले जात असल्याने, येथे घर विकत घेण्यासाठी लोकांत स्पर्धा लागली आहे. येथे आतापर्यंत हजारो परदेशी नागरिकांनी घरं विकत घेतली आहेत.
7 / 10
मात्र, यानंतर येथील महापौरांना आपल्या योजनेसंदर्भात लोकांच्या रोशालाही सामोरे जावे लागले आहे. गाव सोडून गेलेल्या लोकांनी या योजनेला विरोध केला आहे. एवढेच नाही, तर गाव आमचे, घर आमचे, मग ते विकणारे प्रशासन कोन? असा सवालही येथील स्थानिकांनी केला आहे.
8 / 10
यावर उत्तर देत महापौर लिओलुका म्हणाले, गावातील अधिकांश घरे मोडकळीस आली आहेत. येथील लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. यामुळे गाव पुन्हा पूर्वीसारखे करण्यासाठी, असे निर्णय घेणे आपले कर्तव्य आहे.
9 / 10
यातच एका स्थानिक महिलेने आरोप केला आहे, की घरं विकण्यासाठी प्रशासनाने गावातील लोकांची परवानगीही घेतलेली नाही. आता प्रशासनाच्या या निर्णयावर तेथे मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे.
10 / 10
इटलीतील सिसली (sicily) आयलॅन्ड.
टॅग्स :ItalyइटलीHomeघरGovernmentसरकार