शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भूकंप होताच घर चक्क हवेत उडणार, नवं तंत्रज्ञान नैसर्गिक आपत्तीवेळी लोकांचे प्राण वाचवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 15:02 IST

1 / 6
गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मानवाने भरपूर प्रगती केली आहे. मात्र भूकंप, त्सुनामी, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना अजूनही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आजही भूकंप झाल्यास हजारो लोक मृत्युमुखी पडतात. मात्र आता मानवाने त्यावरही तोडगा काढला असून, भूकंपाचा सामना करण्यासाठी खास असं घर विकसित केलं आहे.
2 / 6
ही घरं भूकंप होताच चक्क हवेत उडतील, त्यामुळे त्या घरात वास्तव्य करणाऱ्या माणसांचे प्राण वाचवणं सहजशक्य होणार आहे. भूकंपाचा सामना करण्यासाठीचं हे नवं तंत्र जपानमध्ये विकसित करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना भूकंपाच्या वेळी संरक्षण मिळेल, तसेच घरही कोसळण्यापासून वाचेल.
3 / 6
जपानी कंपनी एअर डॅन्शिनने असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे, ज्यामुळे भूकंप आल्यावर घर आपोआप हवेत वर जाईल. म्हणजेच भूकंप आल्यानंतर घर जमिनीपासू काही सेंटीमीटर वर जाईल. त्यामुळे भूकंपातही घरातील मालमत्तेचं फारसं नुकसान होणार नाही.
4 / 6
या तंत्रज्ञानानुसार बांधलेलं घर एरवी जमिनीवरच राहील. मात्र भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यावर जमिनीमध्ये कंपन होऊ लागलं की हे तंत्रज्ञान सक्रिय होईल आणि घर जमिनीपासून ठराविक उंचीवर जाईल.
5 / 6
एअर डॅन्शिन सिस्टिम आयएनसीने दिलेल्या माहितीनुसार या तंत्रज्ञानामुळे भूकंपादरम्यान, घर जमिनीपासून सुमारे ३ सेंटीमीटर उंचीवर जाईल. भूकंप आल्यानंतर केवळ ५ सेकंदात ही क्रिया घडेल. तसेच जेव्हा भूकंप थांबेल तेव्हा घर आपोआप जमिनीवर येऊन स्थिरस्थावर होईल.
6 / 6
सविस्तर माहितीनुसार भूकंपामुळे जमिनीवर कंपन होऊ लागल्यावर या तंत्रज्ञानामुळे सिस्टिम एअरबॅगमध्ये प्रचंड वेगाने हवा भरली जाईल. त्यानंतर एअरबॅग पूर्ण भरून घर जमिनीपासून काही सेंटीमीटर वर उचलेल. २०२१ मध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी ते यशस्वी ठरले होते.
टॅग्स :EarthquakeभूकंपJapanजपानHomeसुंदर गृहनियोजनtechnologyतंत्रज्ञान