- नितांत महाजनइंडोनेशियातलं एक इटुकलं गाव. अगदी साधं. एरव्ही कुणी गेलंही नसतं त्या गावात. पण कालपासून त्या गावानं, तिथल्या फोटोनं इंटरनेट ब्रेक केलं आहे. अनेकांनी आपल्या विशलिस्टमध्ये हे गाव अॅड केलं असून जन्मात एकदा तरी या गावी जायचंय म्हणून अनेकांनी पोस्ट लिहून त्या गावाचे फोटो शेअर केलेत, फॉरवर्ड केलेत. असं काय आहे या गावात? तर झालं असं की लोकल कमिटीला ( म्हणजे आपली ग्रामपंचायत म्हणा) सरकारनं साधारण ३० कोटी रुपये देऊ केले. अपेक्षा अशी की या गावात असं काही घडावं की रोजगार वाढेल, लोकांना काम मिळेल, टुरिझम वाढेल.एवढा पैसा हाती आल्यावर या गावानं ठरवलं की, आपल्या गावाचं रुपांतरच इंद्रधनुष्यात करुन टाकू. त्यांचे ३० कोटी म्हणजे भारतीय रुपयांत साधारण १३-१४ लाख रुपये होतात. तर त्या पैशातून गावानं आणले रंग. आणि लाल, पिवळा, गुलाबी, निळ्या रंगात सारं गाव रंगवून टाकलं. इतकं सुंदर रंगवलं की आधीचं गाव ओळखून येवू नये. २३२घरांचं हे गाव, कायापालट झाल्यासारखं अप्रतिम देखणं दिसू लागलं. इंडोनेशिया बिल्डर्स असोएिशने त्यासाठी मदतही केली. आणि गावाचं नवीन नामकरण झालं रेनबो व्हिलेज.कामपूंग पेलांगी हे या गावाचं नाव, आणि सेमरांग भागात हे गाव आहे.या गावचे फोटो व्हायरल झाले आणि जगभरात पसरले. आता गावात टुरिस्ट यायला लागलेत. आणि हळूहळू हे गाव मोठं टुरिस्ट डेस्टिनेशन ठरेल अशी गावकऱ्यांना आशा आहे.या गावची एक झलक पहायची?मग हे फोटो आणि सोबतचा व्हीडीओ पहा..एक उत्साही टुरीस्ट असं दिसतंय गाव देखणं गाव रंगच रंग गावातली सुंदर गल्ली आता हा व्हीडीओ पाहा