शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:52 PM

1 / 10
सूर्यमालेत पृथ्वीचा अगदी जवळचा शेजारी असलेला ग्रह म्हणजे मंगळ. जवळपास पृथ्वीसारख्याच असलेल्या या लाल ग्रहाचे माणसांना सुरुवातीपासूनच फार आकर्षण. त्यामुळेच मंगळग्रहावर जाण्याचे स्वप्न मानवाकडून अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे. मात्र त्याआधी माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. अशा अने प्रश्नांपैकी एका प्रश्नाचे उत्तर आता जवळपास मिळाले आहे.
2 / 10
मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवण्यासाठी सुरुवातीला किती माणसांची गरज लागेल या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. एका नव्या अभ्यासानुसार मंगळग्रहावर खूप जास्त लोकांची वस्ती बनवण्याची गरज नाही. तर तिथे राहू शकतील आणि काम करू शकतील, जे तिथे आपली उपयुक्तता सिद्ध करू शकतील एवढ्याच लोकांची वस्ती तिथे स्थापन केली पाहिजे, असे एका संशोधनात म्हटले आहे.
3 / 10
फ्रान्समधील बोर्डिक्स इंस्टिट्युट ऑफ नॅशनल पॉलिटेक्निकचे प्राध्यापक जीन मार्क सल्लोटी यांनी हे संशोधन केले आहे. प्रा. जीन यांनी गणितीय फॉर्म्युल्याच्या माध्यमातून या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले आहे. हा फॉर्म्युला मंगळ ग्रहावर किती माणसं राहू शकतील, याचं उत्तर शोधणारे उत्तम समिकरण आहे, असा दावा जीन यांनी केला आहे.
4 / 10
प्रा. जीन म्हणाले, मंगळ ग्रहावर खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना नेऊन वस्ती वसवण्याची गरज नाही. केवळ ११० लोकांना मंगळावर नेऊन वसवणे पुरेसे ठरेल. कारण मंगळावर जो कुणी राहील त्याला काही ना काही खूप महत्त्वपूर्ण काम करावे लागेल, त्यामुळे वेळ आणि स्रोतांचे योग्य विभाजन करता येईल.
5 / 10
स्पेस एक्ससारख्या अनेक कंपन्या सध्या अशी रॉकेट्स विकसित करत आहेत. जी एकाच वेळी अनेक माणसांना मंगळ ग्रहापर्यंत घेऊन जातील, असे मार्क सल्लोटी यांनी सांगितले.
6 / 10
जर कुणाला मंगळ ग्रहावर जाऊन मानवी वस्ती वसवायची असेल तर त्याला तेथील गणित, हवामान आणि कामाप्रमाणे स्वत:ला जुळवून घ्यावे लागेल. अन्यथा तिथे टिकून राहणे खूप कठीण होऊ शकते.
7 / 10
मंगळ ग्रहावर एवढ्या लोकांना राहण्यासाठी एक मोठा डोम तयार करावा लागेल. त्यामध्ये सातत्याने ऑक्सिजनचा पुरवठा होत राहील याची व्यवस्था करावी लागेल, असे प्राध्यापक जीन यांनी सांगितले.
8 / 10
या डोमखालीच शेती आणि उद्योग विकसित करावे लागतील. प्राध्यापक जीन म्हणतात, मी केवळ एक छोटासा फॉर्म्युला दिला आहे. जेणेकरून मंगळ ग्रहावर राहण्यासाठी कमीत कमी ११० लोकांची गरज भासेल, हे आम्ही लोकांना सांगू शकू.
9 / 10
मंगळ ग्रहावर जसजशा गरजा वाढू लागतील, राहण्यायोग्य मुलभूत विकास होत राहील. तसतशी येथील मानवी वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाईल.
10 / 10
कामाच्या विभाजनाशिवाय तिथे राहणे कठीण होईल, असे प्राध्यापक जीन यांनी सांगितले. प्राध्यापक जीन मार्क यांचा हे संशोधन नेचर या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.
टॅग्स :Marsमंगळ ग्रहEarthपृथ्वीscienceविज्ञान