A huge asteroid 2018 AH stronger than a nuclear bomb is headed our way this month
पृथ्वीच्या दिशेनं येतंय संकट! २७ डिसेंबर २०२१ ला काय घडणार?; NASA चा सतर्कतेचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 4:03 PM1 / 10या वर्षाच्या अखेरीस पृथ्वीच्या दिशेने मोठं संकट येणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये पृथ्वीच्या जवळून हे संकट गेले होते. NASA च्या एस्टेरॉयड ट्रॅकरच्या अंदाजानुसार, एस्टेरॉयड २०१८(Asteroid 2018 AH) ची लांबी कुतिबमीनारच्या अडीच पण जास्त आहे. जर ते जमिनीवर कुठे धडकलं तर बॉम्बस्फोटासारखा विध्वंस निर्माण करू शकतो. 2 / 10पृथ्वीच्या दिशेने येणारं हा लघुग्रह Asteroid 2018 AH १९० मीटर उंच आणि ६२३ फूट लांब आहे. म्हणजे कुतुबमीनारच्या अडीचपट जास्त. NASA एस्टेरॉयड ट्रॅकरच्या मते, येत्या २७ डिसेंबर २०२१ रोजी पृथ्वीच्या जवळून हा लघुग्रह जाणार आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता कमी आहे. परंतु जर हे धडकलं तर आण्विक बॉम्बसारखं सगळं काही उद्ध्वस्त होईल.3 / 10एस्टेरॉयड २०१८ एएच पृथ्वीपासून जवळपास ४८ लाख किमी दूरहून जाणार आहे. २०१८ मध्ये तो २.९६ लाख किमी अंतरावरुन गेला होता. यावेळी तो खूप दूर आहे. परंतु अंतराळात हे अंतर जास्त नाही. कारण जर दिशेत एक डिग्री अंतर निर्माण झालं तर धोका वाढू शकतो. पृथ्वी चंद्रापासून ३.८४ किमी अंतरावर आहे. म्हणजे या एस्टेरॉयडचा १२ वा हिस्सा आहे.4 / 10२०१८ मध्ये वैज्ञानिकाने त्याचा शोध घेतला होता जेव्हा तो पृथ्वीपासून अगदी जवळून जाणार होता. हा लघुग्रह येण्याची सूचना मिळाली नव्हती कारण त्यामध्ये कुठलाही प्रकाश नाही. गडद रंगाचा हा ग्रह आहे. रात्रीच्यावेळी काहीच दिसत नाही. २०१८ नंतर इतक्या मोठ्या आकाराचा कुठलाही ग्रह पृथ्वीच्या जवळून गेला नाही.5 / 10२०२८ मध्ये एक किलोमीटर लांबीचा एस्टेरॉयड १५३८१४ पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. परंतु त्यामुळे कुठलाही धोका नाही. तो २.४९ लाख किमी अंतरावरुन जाणार आहे. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का? की कुतुबमीनारच्या आकाराहून अडीच पट जास्त मोठा एस्टेरॉयड जर पृथ्वीला धडकला तर काय होईल?6 / 10पृथ्वीवर अखेरचा एस्टेरॉयड जेव्हा पडला होता तेव्हा रशियात मोठी हानी झाली होती. २०१३ मध्ये हा एस्टेरॉयड १७ मीटर लांबीचा रशियाच्या वर येऊन सौरमंडळात फुटला. ज्यामुळे एका शहराच्या सर्व इमारतीच्या खिडक्या तुटल्या. अनेक लोक जखमी झाले. याआधी १९०८ मध्ये अशीच घटना घडली होती. 7 / 10एस्टेरॉयड २०१८ एएच जर कुठल्याही परिसराच्या आकाशात हवेत फुटला तर जवळपास १२ मेगाटन ताकदीनं त्याचा स्फोट होईल. ज्यामुळे हजारो किमी अंतरावर विध्वंस होईल. हिरोशिमा-नागासकीत टाकलेल्या आण्विक बॉम्बपेक्षा ८०० पट जास्त ताकद असेल. 8 / 10हिरोशिमाच्या स्फोटात १.३५ लाख लोकं मारली गेली होती. म्हणजे लोकसंख्येच्या अर्धा हिस्सा संपला होता. तुंगसुका इंवेंटमध्ये ३ लोकांच्या मृत्यूची बातमी होती त्याठिकाणी जास्त लोकं नव्हती. त्या परिस्थितीचे पुरावे आजही आहेत. तुंगसुका इवेंटमध्ये ८ कोटी वृक्ष पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. 9 / 10वैज्ञानिकांच्या मते, तुंगसुका इवेंटच्यावेळी आकाश २ रंगात परिवर्तित झालं होतं. उत्तरेकडे आगीच्या ज्वालेप्रमाणे दिसत होतं. आगीच्या विळख्यात ८ कोटी वृक्ष आली. काही मिनिटं आकाशातून पृथ्वीकडे आगीचे गोळे फेकत असल्याचं वाटत होतं. तुंगसुका इवेंट आधुनिक इतिहासातील सर्वात मोठी अंतराळातील संकटाची घटना मानली जाते.10 / 10नासाच्या माहितीनुसार, जर कोणता एस्टेरॉयड १४० मीटरपेक्षा जास्त लांबीचा असेल तर तो तुंगसुका इवेंटसारखा नुकसान करण्याची क्षमता ठेवतो. एस्टेरॉयड २०१८ एएच तर १९० मीटर लांब आहे. म्हणजे जास्त नुकसान. जर हा कुठल्याही समुद्रात पडला तर भयानक त्सुनामी आणि भूकंप येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आसपासच्या देशांना मोठा संकटाचा सामना करावा लागू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications