शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या सुंदर बेटावरचं मानवी जीवन संकटात, आता उरली आहेत केवळ तीन मुले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:56 PM

1 / 8
एकीकडे भारतासारखा देश वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त असताना दुसरीकडे दक्षिण कोरियामध्ये एक असे बेट आहे जिथे केवळ १०० लोकच उरले आहेत. त्यामध्ये केवळ तीन लहान मुलांचा समावेश आहे. दक्षिण कोरियातील वृद्ध होत असलेली लोकसंख्या आणि वेगाने घटत असलेला जन्मदर यामुळे या बेटावर अशी परिस्थिती ओढवली आहे.
2 / 8
या मुलांमध्ये ल्यू चान ही आणि त्याच्या दोन बहिणींचा समावेश आहे. ल्यू चान ही याने रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, इथे अजून काही मुले असती तर मला बरे वाटले असते. इथे माझ्यासाठी खेळण्याचे पर्याय उपलब्ध असते. मात्र इथे आसपास लहान मुलेच नाहीत. त्यामुळे मला ६६ वर्षांच्या किम सी यंग यांच्यासोबत खेळावे लागते.
3 / 8
गेल्या काही दशकांपासून दक्षिण कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. त्यामुळे देशातील काही भागांत खूप कमी लोक उरले आहेत. नोकोडो बेटाचा विचार केल्यास आता या बेटावर केवळ १०० लोक उरले आहेत. या बेटावर असलेली शाळा पंधरा वर्षांपूर्वीच बंद पडली आहे. या मुलांना एका तात्पुरत्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे.
4 / 8
हे बेट एकेकाळी मासेमारीसाठी खूप प्रसिद्ध होते. किम सांगतात की, मी जा ठिकाणाला वाचवू इच्छितो. मात्र येथील सातत्याने घटत असलेली लोकसंख्या माझ्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सियोलसारखे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नाही. मात्र एकटेपणामुळे येथील अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
5 / 8
दक्षिण कोरिया जगातील सर्वात वेगाने वृद्ध होत असलेल्या देशांपैकी एक देश आहे. याशिवाय या देशामध्ये जन्मदरसुद्धा खूप कमी आहे. दक्षिण कोरियाची लोकसंख्या अशाच प्रकारे कमी होत गेली तर नोकोडो बेट पूर्णपणे नष्ट होईल आणि येथे राहणारा कुणीच नसेल.
6 / 8
दक्षिण कोरिया जगातील सर्वात वेगाने वृद्ध होत असलेल्या देशांपैकी एक देश आहे. याशिवायया देशामध्ये जन्मदरसुद्धा खूप कमी आहे. दक्षिण कोरियाची लोकसंख्या अशाच प्रकारे कमी होत गेली तर नोकोडो बेट पूर्णपणे नष्ट होईल आणि येथे राहणारा कुणीच नसेल. दक्षिण कोरियामध्ये लोकसंख्येतील वृद्धांचे प्रमाण वाढत असून, जन्मदरही घटत आहे. त्यातच २०२०मध्ये दक्षिण कोरियाची लोकसंख्या ही या देशाच्या सामान्य लोकसंख्येपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे एकेदिवशी हे बेट पूर्णपणे निर्मनुष्य होईल, अशी भीती अनेकजण व्यक्त करत आहेत.
7 / 8
कोरिया इकॉनॉमिक रिसर्च इंस्टिट्युटच्या एका संशोधकांनी रॉयटर्ससोबत झालेल्या चर्चेमध्ये सांगितले की, दक्षिण कोरियामध्ये घटलेल्या लोकसंख्येमुळे अनेक लहान लहान शहरे आणि वस्त्या पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. येथील जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये निर्माण झालेल्या तफावतीमुळे परिस्थिती अधिकच खराब होत आहे.
8 / 8
दक्षिण कोरियामध्ये १९७० मध्ये जन्मदर ४.५ होता. तो २०२० मध्ये घटून ०.८ टक्के झाला आहे. १९७० मध्ये या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली होती. तसेच महिलासुद्धा व्यावसायिक कार्यांमध्ये सहभागी होऊ लागल्या होत्या. कुटुंबनियोजनासाठी मोहिमा जोरात सुरू होत्या. त्याशिवाय वाढती महागाई आणि गेल्या वर्षभरापासून वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे मुलांना जन्म देण्याबाबत लोकांमध्ये नकारात्मक विचार येऊ लागले आहेत.
टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाInternationalआंतरराष्ट्रीय