शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मगरीच्या पोटात सापडले असे काही, पाहून अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

By बाळकृष्ण परब | Published: February 19, 2021 9:53 AM

1 / 6
ऑस्ट्रेलियामधील क्विन्सलँडमधील उत्तर भागात एका मगरीच्या पोटात असे काही मिळाले की ते पाहून अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
2 / 6
ऑस्ट्रेलियामधील क्विन्सलँडमध्ये हा प्रकार घडला असून, या मगरीच्या पोटामधून मानवी देहाचे अवशेष सापडले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार हे अवशेष एका मच्छिमाराचे आहेत.
3 / 6
लाइव्ह सायन्स डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे अवशेष कदाचित ६९ वर्षीय मच्छिमार अँड्र्यू हर्ट यांचे असावेत. ते ११ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत. अँड्र्यू हर्ट या मच्छिमाराला गेल्या गुरुवारी दुपारी शेवटचे पाहण्यात आले होते. ते मासे पकडण्यासाठी नाव घेऊन गेले होते मात्र त्यानंतर ते परत आले नव्हते. ते परत न आल्याने तसेच रेडिओवर त्यांची प्रतिक्रिया येणे बंद झाल्याने त्यांच्या पत्नीने अधिकाऱ्यांना कळवले होते.
4 / 6
शुक्रवारी रात्री जेव्हा अधिकाऱ्यांनी तपास केला तेव्हा त्यांना धक्कादायक बाब दिसून आली. त्यांना नौकेजवळ एक महाकाय मगर दिसली. पर्यावरण अधिकाऱ्यांनी या मगरीला पकडले आणि तिचे पोट कापले. तेव्हा तिच्या पोटात मानवी अवशेष पाहून अधिकाऱ्यांना धक्का बसला.
5 / 6
स्थानिक प्रशासन आणि क्विन्सलँड एन्व्हायरमेंटने आपल्या वक्तव्यामध्ये सांगितले की, पकडण्यात आलेल्या मगरीच्या आधारावर हे मानण्यात येत आहे की, मच्छिमाराच्या गायब होण्यामागे मगरीचीच भूमिका आहे. या कठीण वेळी आमच्या संवेदना मच्छिाराच्या कुटुंबीयांसोबत आहेत.
6 / 6
क्विन्सलँडच्या आसपासच्या किनाऱ्यांवर मगरीची सर्वात मोठी प्रजाती दिसून येते. येथे खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या मगरी आढळतात. क्विन्सलँड संग्रहालयाच्या म्हणण्यानुसार खाऱ्या पाण्यातील मगरी २३ फुटांपर्यंत वाढू शकतात. मात्र क्वचितच १६ फुटांहून अधिक लांबीच्या मगरी सापडतात.
टॅग्स :wildlifeवन्यजीवAustraliaआॅस्ट्रेलिया