शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बर्फ विरघळला आणि ४० हजार वर्षे जुना ठेवा समोर आला

By बाळकृष्ण परब | Published: January 27, 2021 11:50 PM

1 / 9
पृथ्वीच्या उदरात, समुद्रतळाशी आणि ध्रृवीय प्रदेशातील बर्फात अनेक रहस्ये गाडलेली आहे. कधी कधी अशी रहस्ये समोर येत असतात. दरम्यान, २६ जानेवारी रोजी रशियातील सैबैरियामध्ये असेच ४० हजार वर्षांपूर्वीचे रहस्य समोर आले आहे.
2 / 9
सैबेरियामध्ये शास्त्रज्ञांना ४० हजार वर्षे जुना केसाळ गेंड्याचे अवशेष सापडले आहेत. हा गेंडा ४० हजार वर्षांपासून सैबैरियातील पर्माफ्रॉस्टमध्ये दबलेला होता. बर्फ वितळल्यानंतर या गेंड्याचे शरीर बाहेर आले.
3 / 9
सैबेरियातील याकुतिया परिसरात बर्फ विरघळल्यानंतर एका प्राण्याचे शरीर बाहेर आले. स्थानिकांनी याची माहिती तज्ज्ञांना दिली. तज्ज्ञ जेव्हा आले तेव्हा त्यांना भुरकट रंगाचा लांब केस असेला गेंडा चिखलात दबलेल्या अवस्थेत असल्याचे पाहिले. त्याच्या शरीराचे अनेक भाग आणि केस अजूनही सुस्थितीत होते.
4 / 9
डेली मेलमधील वृत्तानुसार तज्ज्ञांच्या मते लांब केस असलेल्या या गेंड्यावर पर्वतीय सिंहाने हल्ला केला असावा. त्या हल्ल्यातून वाचण्यासाठी तो पळाला असावा आणि चिखलात येऊन फसला असावा. किंवा पुन्हा एकदा नदीतून वाहत इथपर्यंत आला असावा. पर्वतीय सिंहाची प्रजाती आता संपुष्टात आली आहे.
5 / 9
लांब केस असलेल्या गेंड्याची प्रजाती युरोपमध्ये हिमयुगापूर्वी जीवित होती. युरोपीय हिमयुग ही १४ हजार वर्षांपूर्वीची घटना आहे. मात्र लांब केस असलेल्या या सिंहाच्या वयाचा अंदाज लागलेला नाही. मात्र त्याचे वय हे २५ वर्षे ते ४० हजार वर्षे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
6 / 9
लांब केस असलेल्या गेंड्याची प्रजाती केवळ युरोप आणि सैबैरियात नाही तर त्यावेळच्या चीन आणि दक्षिण कोरियामध्येही अस्तित्वात होती. या गेंड्याचे अवशेष या देशांमधूनही सापडले होते. वातावरणातील बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे यांची प्रजाती संपुष्टात आली.
7 / 9
सैबेरियात सापडलेल्या लांब केस असलेल्या गेंड्याची लांबी सुमारे आठ फूट, तर लांबी साडेचार फूट होती. सापडलेल्या गेंड्याचे वय मृत्यूसमयी तीन ते चार वर्षे असावे. हा गेंडा जगातील सर्वात थंड प्रदेश असलेल्या याकुतियाच्या एबिस्की जिल्ह्यातील तिर्कीयान नदीत सापडला.
8 / 9
या लांब केस असलेल्या गेंड्याचे केस, कातडी, दात, हाडे आणि शिंगे एवढ्या वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत. आता तज्ज्ञ या गेंड्याच्या मृत्यूचे कारण शोधणार आहेत. तसेच या गेंड्याच्या माध्यमातून त्या काळातील जीवनाची माहिती मिळणार आहे.
9 / 9
आतापर्यंत या लांब केस असलेल्या गेंड्याच्या लिंगाची माहिती समजू शकलेली नाही. मात्र लवकरच ही माहिती समजेल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. हा गेंडा नदीत बुडून मृत्यू पावला असावा, से डॉ. अल्बर्ट प्रोतोपोपोव्ह यांनी सांगितले.
टॅग्स :historyइतिहासrussiaरशियाscienceविज्ञान