शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकिस्तानच्या हाती आशियातील हा मोठा खजिना लागला तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 3:28 PM

1 / 7
आर्थिक संकटाशी तोंड देत असलेल्या पाकिस्तानला अच्छे दिन येण्याची आस लागली आहे. पाकिस्तान सरकारचे मंत्री अब्दुला हुसैन हरुन यांनी पाकिस्तान-इराण सीमेवर अमेरिकन कंपनी एक्सॉनमोबिल यांच्या मोठ्या प्रमाणात तेलसाठा शोधण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहे.
2 / 7
अमेरिकन बहुराष्ट्रीय तेल आणि गॅस कंपनी सध्या पाकिस्तानच्या कराची येथील समुद्र किनाऱ्यावर 5 हजार मीटर खोदकाम पूर्ण केलं असून त्याठिकाणी तेलाचा साठा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 / 7
आधीच तीन आठवडे खोदकाम करण्यास अडचणी निर्माण झाल्याने याला विलंब झाला. मिळालेल्या संकेतानुसार पाकिस्तान हद्दीतील समुद्रामध्ये आशियातील सर्वात मोठा तेलसाठा असल्याचं दिसून येत आहे. जर असं झालं तर पाकिस्तानची आर्थिक गणिते पूर्णपणे बदलली दिसून येतील.
4 / 7
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मागील गुरुवारी तसे संकेतही दिले आहेत. इमरान खान यांनी पाकिस्तानच्या लोकांना देशासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केलं आहे. लवकरच आपल्या तेलाचा साठा मिळो ही अपेक्षा पूर्ण व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
5 / 7
जर पाकिस्तानला हा तेलसाठा मिळाला तर पाकिस्तान तेल उत्पादकाच्या 10 सूची असलेल्या यादीत समाविष्ट होईल, कुवैत सारख्या देशालाही पाकिस्तान मागे टाकेल. जगभरातील एकूण तेलसाठ्यापैकी 8.4 टक्के तेल साठ्याचा कुवैत मालक आहे.
6 / 7
मागील काही वर्षापासून तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याने पाकिस्तानला सध्या मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करावी लागते. त्यासाठी देशाच्या अर्थकारणातील मोठा भाग परदेशी चलनासाठी खर्च करावा लागत आहे. जर हा तेलसाठा मिळाला तर पाकिस्तानला तेल आयात करण्याची गरज भासणार नाही.
7 / 7
पाकिस्तानला हा तेलसाठा मिळाला तर पाकिस्तानच्या प्रगतीत कोणतेही अडथळे येणार नाही असा विश्वास पंतप्रधान इमरान खान यांनी व्यक्त केला.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानCrude Oilखनिज तेलIranइराणEconomyअर्थव्यवस्था