शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इस्राइल आणि इराण यांच्यात युद्ध झाल्यास कोण जिंकणार? कोण आहे अधिक शक्तिशाली, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 7:28 PM

1 / 9
मध्य-पूर्व आशियामधील देशांमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. तसेच इस्राइल आणि इराणमध्ये कधीही युद्धाला तोंड फुटेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये युद्धाला तोंड फुटल्यास कुणाचं लष्कर वरचढ ठरेल, याबाबतचा अंदाज बांधला जात आहे.
2 / 9
दरम्यान, इस्माइल हानियाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराण इस्राइलवर हल्ला करणात हे आता अमेरिकेनेही गृहित धरले आहे. मात्र असा संघर्ष झाल्यास त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस आणि जीवितहानी होऊ शकते. सद्यस्थितीत अत्याधुनिक शस्त्रसामुग्रीमुळे इस्राइलचं पारडं जड आहे. तसेच पुढे काय होईल हे सांगता येत नाही. यादरम्यान इस्राइल आणि इराण यांच्यापैकी कुणाकडे शक्तिशाली लष्कर आहे तसेच युद्धाला तोंड फुटल्यास कुठला देश कुणाला साथ देईल, याबाबतही उत्सुकता आहे.
3 / 9
युद्धाला तोंड फुटल्यास अमेरिका इस्राइलला मदत करण्याची तयारी करत असल्याचं वृत्त अमेरिकेतील सूत्रांनी दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फॉर स्टॅटर्जिक स्टडीजने इराण आणि इस्राइल या देशांचं लष्कर आणि हत्यारांबाबत बरीच माहिती दिली होती.
4 / 9
या अध्ययनामध्ये इस्राइली आणि इराणी क्षेपणास्त्रं आणि हल्ला करण्याची क्षमता यांचीही तुलना करण्यात आली होती. २०२२-२०२३ मध्ये इराणची संरक्षणासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद ७.४ अब्ज डॉलर होती. तर इस्राइलकडून १९ अब्ज डॉलर एवढी तरतूद करण्यात आली होती. जीडीपीच्या तुलनेत इस्राइलची संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद ही इराणपेक्षा दुप्पट आहे.
5 / 9
इस्राइलकडे ३५० च्या आसपार लढाऊ विमानं आहेत. त्यामध्ये एफ-१५, एफ-३५ आदी विमानांचा समावेस आहे. तर इराणकडे ३२० लढाऊ विमानं आहेत. संख्येच्या बाबतीत दोन्ही देश बरोबरीत असले तरी इराणकडणे जुन्या तंत्रज्ञानाची बहुतांश विमानं आहेत. तर इस्राइलकडे अद्ययावत तंत्रज्ञान असलेली विमानं आहेत.
6 / 9
इस्राइलकडे अंतर्गत सुरक्षेसाठी एक आयरन डोम आहे. याच्या मदतीने इस्राइल आपल्या देशातील लोकवस्तीच्या दिशेनं येणारी क्षेपणास्र हवेतच नष्ट करतं. गाझामध्ये युद्धाला तोंड फुटल्यापासून इस्राइलने इराणकडून डागण्यात आलेली ३०० हून अधिक क्षेपणास्रं नष्ट केली आहेत. तर इस्राइलकडे घातक ड्रोन आहेत. इराणची संरक्षण व्यवस्थाही भक्कम आहे. पण ती आयरन डोमच्या तोडीची नाही. तसेच इराणच्या नौदलाचंही आधुनिकीकरण झालेलं नाही.
7 / 9
आता सैन्यसंख्येचा विचार करायचा झाल्यास यामध्ये इराण कैकपटीने वरचढ आहे. इस्राइलकडे केवळी ७० हजार सक्रिय सैनिक आहेत. तर इराणकडे तब्बल ६ लाख सक्रीय सैनिक आहेत.
8 / 9
याबरोबरच इस्राइलकडे मोसाद नावाची अत्यंत खतरनाक अशी गुप्तहेर संस्था आहे. त्याशिवाय इराण आणि इस्राइल या दोन्ही देशांकडे अण्वस्रेही आहेत. मात्र त्याची कबुली त्यांनी दिलेली नाही. मध्य पूर्वेतील राजकारणामध्ये अमेरिका कायम इस्राइलसोबत उभी राहते. तर इराणचा इराक आणि सिरीयामध्ये प्रभाव आहे. दरम्यान, युद्धाला तोंड फुटल्यास अमेरिका इस्राइलच्या मदतीला येईल, हे जवळपास निश्चित आहे.
9 / 9
आता नाविक बळाचा विचार करायचा झाल्यास इराणजवळ १९ तर इस्राइलकडे केवळ ५ पाणबुड्या आहेत. काही काळापूर्वी ग्लोबल फायर पॉवरवने केलेल्या अध्ययनामध्ये एकूण ८ मुद्द्यांचा विचार करण्यात आला त्यामध्ये ६ बाबतीत इराण तर २ बाबतीत इस्राइल वरचढ असल्याचं दिसून आलं आहे.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय