If you don't listen, be prepared for war, China is threatening to Taiwan BKP
ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 1:39 PM1 / 8कोरोना विषाणूच्या जगभरात झालेल्या फैलावामुळे सध्या जागतिक पातळीवर चीनची चौफेर कोंडी झाली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या चीनकडून आपला देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध हातखंडे वापरण्यात येत आहेत. दरम्यान, त्याचाच एक भाग म्हणून चीनने तैवानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 2 / 8तैवान चीनसोबतच्या विलिनीकरणास तयार झाला नाही तर त्याच्यावर हल्ला करण्यात येईल, अशी धमकी चीनने दिली आहे. चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनचे सदस्य आणि जॉईंट स्टाफ डिपार्टमेंटचे प्रमुख ली झुओचेंग यांनी सांगितले की, तैवानला स्वतंत्र होण्यापासून रोखण्यासाठी कुठलाही मार्ग शिल्लक न राहिल्यास चीन तैवानवर हल्ला करेल. 3 / 8ली झुओचेंग हे चीनमधील एक वरिष्ठ जनरल आहेत. चीनमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींकडून अशा प्रकारचे आक्रमक वक्तव्य येणे फार दुर्मिळ आहे. बीजिंगमधील ग्रेट हॉल ऑफ द पब्लिकमध्ये शुक्रवारी ली यांनी ही गोष्ट सांगितली. 4 / 8 ली झुओचेंग यांनी सांगितले की, जर शांततेच्या मार्गाने एकीकरण करण्याचे मार्ग संपले तर चीनचे सैन्य संपूर्ण देशाला सोबत घेऊन तैवानमधील फुटिरतावाद्यांवर कारवाई करेल. 5 / 8जॉईंट स्टाफ डिपार्टमेंटचे प्रमुख ली झुओचेंग यांनी सांगितले की, आम्ही सुरक्षा दलांचा वापर न करण्याचे वचन देत नाही आहोत. तैवानमधील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही हा पर्याय राखून ठेवला आहे. 6 / 8ली हे चीनच्या अँटी सेक्शन कायद्याच्या १५ व्या वर्धापनदिनी बोलत होते. हा कायदा तैवानने वेगळे होण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर लष्करी कारवाई करण्याचा अधिकार चीनला देतो. 7 / 8सीनियर जनरल यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा चीन हाँगकाँगवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी नॅशनल सिक्युरिटी कायदा लागू करत आहे. 8 / 8 चीन अनेक वर्षांपासून तैवानला आपला अविभाज्य भाग मानत आला आहे. मात्र तैवान स्वत:ला नेहमीच वेगळा देश मानत आला आहे. तसेच तैवानचे स्वत:चे लोकनियुक्त सरकार आङे. मात्र चीनच्या विरोधामुळे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तैवानला स्थान मिळालेले नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications