शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील 'या' सुंदर ठिकाणी जाण्यासाठी व्हा तयार; थांबल्यास मिळतील लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 6:23 PM

1 / 7
अनेकांना विदेशात फिरण्यासाठी जाण्याची आवड असते. पण, विदेशात फिरण्यासाठी जाणे अत्यंत महागडे आहे. मात्र, जगात असेही काही देश आहेत, जेथे आपल्याला राहण्यासाठी पैसे दिले जातात, हे आपल्याला माहीत आहे का? एवढेच नाही, तर या ठिकाणचे सौंदर्य आपल्याला अक्षरशः भुरळ घालेल... (Settle in Foreign Countries)
2 / 7
इटली - इटलीतीलमध्ये स्थायिक झाल्यावर कॅंडेला आणि कॅलाबेरिया सारखी शहरे आर्थिक मदत करत आहेत. एकटी व्यक्ती येथे स्थायिक होण्यासाठी आल्यास, तिला 1 लाख रुपयांपेक्षाही अधिकचे अनुदान आणि एखादे कुटुंब स्थलांतरित झाल्यास 1.7 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. कॅलाबेरियामध्ये स्थायिक होण्यासाठी 40 वर्षांपेक्षा कमी वय असणे आवश्यक आहे. कॅलाबेरियामध्ये 3 वर्षांच्या वास्तव्यादरम्यान 24 लाखांपेक्षाही अधिकचे अनुदान मिळू शकते.
3 / 7
याशिवाय इटलीत एक दुसरी ऑफरही सुरू आहे. येथील सिसिली, सार्डिनिया, अबरूजो आणि मिलानो (Sicily, Sardinia, Abruzzo and Milano) सारख्या शहरांत केवळ 87 रुपयांमध्ये घर मिळू शकते. मात्र, या जुन्या घरांची दुरुस्ती आपापल्या खर्चाने करावी लागेल.
4 / 7
व्हरमाँट - जर आपले वर्क फ्रॉम होम सुरू असेल, तर हे शहर आपल्यासाठी अत्यंत चालत आहे. येथे 2 वर्षांपर्यंत राहण्यासाठी सरकार 7.4 लाख रुपये देण्यास तयार आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य या ठिकानाला पर्यटनासाठी एक आदर्श डेस्टिनेशन बनवते.
5 / 7
ओकलाहोमा - तुलसा शहराला रिमोट कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. ते येथे आपल्याला 10,000 डॉलर म्हणजेच 7,47385 रुपयांच्या अनुदानासह मोफत डेस्क स्पेस आणि नेटवर्किंग इव्हेंट्सचा एक्सेसही देत आहेत.
6 / 7
स्पेन - जर आपण स्पेनच्या पोंगा टाउनमध्ये राहण्यासाठी गेलात तर, येथे शिफ्ट झाल्यानंतर, आपल्याला २.६ लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे, जर एखाद्या कपलला मुलगा झाला, तर प्रत्येक मुलाला 2.6 लाख रुपयांपर्यंत दिले जातात. याशिवाय रुबिया टाऊनमध्ये राहणाऱ्यांना दर महिन्याला 8 हजार रुपये एढे अनुदान मिळते.
7 / 7
स्वित्झर्लंड - 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांसाठी स्वित्झर्लंडच्या अल्बिनेन (Albinen) येथे सेटल झाल्यास चांगली ऑफर आहे. येथे सेटल झाल्यास 21 लाखहून अधिक रुपये मिळतील. मात्र, येथे राहिल्यास आपल्याला 10 वर्षांपर्यंत याच शहरात रहावे लागेल, अशी अट आहे. ही ऑफर केवळ स्वित्झर्लंडच्या नागरिकांसाठी अथवा एखाद्या स्विस रेसिडेंटसोबत लग्न केलेल्यांसाठीच आहे.
टॅग्स :ItalyइटलीSwitzerlandस्वित्झर्लंड