Imran Khan's hat-trick!
इमरान खान यांची हॅटट्रिक! By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 2:56 PM1 / 7पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इमरान खान यांनी तिस-यांदा निकाह केला.2 / 7बुशरा मनेका असे त्यांच्या तिस-या पत्नीचं नाव आहे. रविवारी (18 फेब्रुवारी ) लाहोर येथे अगदी साध्या समारंभात त्यांनी आपला निकाह केला.3 / 7पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ ( पीटीआय )चे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी इमरान खान यांच्या तिस-या निकाहच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुशरा मनेका यांच्या निवासस्थानी त्यांचा निकाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात केवळ जवळच्या नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, इमरान खान यांच्या बहिणी निकाह सोहळ्या सहभागी झाल्या नव्हत्या. अवन चौधरी व जुल्फी बुखारी यांच्या उपस्थितीत त्यांचा निकाह झाला. चौधरी व बुखारी हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. 4 / 7पार्टी नेता इनामुल हक यांनी सांगितले की, इमरान खान यांना अगदी साध्या पद्धतीनं निकाह करायचा होता. केवळ इमरान खान व त्यांच्या पत्नीसाठीच नाही तर संपूर्ण पाकिस्तानसाठी हा निकाहसोहळा आनंद घेऊन येईल, अशी आशाही यावेळी हक यांनी व्यक्त केली.5 / 7नईमुल हक, शीरीन मजारी, जहांगीर तारीन, शाह महमूद कुरैशी यांच्यासहीत पार्टीच्या नेत्यांनी इमरान खान आणि त्यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका यांना निकाहच्या ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.6 / 740 वर्षीय बुशरा मनेका यांचा यापूर्वी खवर फरीद मनेका यांच्यासोबत निकाह झाला होता. खवर फरीद मनेका हे इस्लामाबाद येथे वरिष्ठ कस्टम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बुशरा यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 7 / 7इमरान खान यांचे यापूर्वी दोनदा निकाह झाले आहेत. पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यासोबत त्यांनी 1995 साली निकाह केला होता. 2004 मध्ये त्यांनी जेमिमा यांना घटस्फोट दिला. आणखी वाचा Subscribe to Notifications