अमेरिकेत म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 3:47 PM
1 / 4 अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका म्युझिक फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारात 50 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी असल्याची माहिती आहे, त्यापैकी 12 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले अनेकजण गंभीर जखमी आहेत. 2 / 4 सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे कॅसिनोजवळ स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता हा गोळीबार झाला. या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. त्याचवेळी हल्लेखोर घुसले आणि मशीनगनमधून गोळीबार केला. 3 / 4 पोलिसांनी एका हल्लेखोराचा खात्मा केला आहे. नागरिकांनी या परिसरापासून दूर राहावे, असे ट्विट लास व्हेगास मेट्रोपोलिटन पोलिसांनी केले आहे. 4 / 4 प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गायक जेसोन एल्डिनचा परफॉर्मन्स सुरु असताना गोळीबार झाला. अचानक गोळीबाराला सुरूवात झाल्याने गोंधळ उडाला आणि जीव मुठीत धरून लोकांनी पळायला सुरूवात केली. आणखी वाचा