शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, मदत मागितली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 5:27 PM

1 / 10
भारत आणि अमेरिकेने चोहोबाजुंनी घेरल्याने चीन एकाकी पडला आहे. यामुळे कधी नव्हे तो चीन रशियाला शरण गेला आहे. जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीन यांना फोन करून मदत मागितली आहे.
2 / 10
यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतीन यांना रणनीतिक सहकार्य आणि संपर्कात सारहण्यासाठी गळ घातली आहे. मॉस्को आणि बिजिंग हे एकाधिकारशाही आणि सत्तापिपासूच्या विरोधात आहेत, असा दावा जिनपिंग यांनी केला आहे.
3 / 10
शी जिनपिंग यांनी बुधवारी पुतीन यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत चीन आणि रशियाने एकमेकांशी सहकार्य आणि संपर्क वेगाने करावा.
4 / 10
चीन आणि रशियामध्ये ही चर्चा अशावेळी झाली आहे जेव्हा अमेरिकेसोबत चीनचे संबंध खूपच बिघडलेले आहेत. तर तिकडे भारताच्या सीमेवरही चीन तणावात असून गलवानमध्ये तोंडघशी पडला आहे.
5 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार असल्याने अभिनंदन केले होते. यावेळी त्यांनी चीनविरोधातील तणाव पाहून तातडीने 33 लढाऊ विमाने देण्याचे कबुल केले होते.
6 / 10
याचसोबत रशिया भारताला क्षेपणास्त्रविरोधी 400 ही यंत्रणा देणार आहे. चीनसाठी यामुळे डोकेदुखी ठरणार आहे.
7 / 10
काही दिवसांपूर्वीच चीनच्या सरकारी वृत्तपत्राने रशियाच्या व्लादिवोस्तोक या शहरावर दावा केला होता. यानंतर वाद सुरु झाला होता. हे शहर म्हणे 1860 मध्ये चीनचा भाग होते. हे शहर रशियाने चीनकडून तहात फसवून हिसकावून घेतले होते.
8 / 10
रशियाने काही दिवसांपूर्वीच चीनच्या गुप्तहेर संघटनेवर गंभीर आरोप लावले होते. रशियाच्या पाणबुडीचे अत्यंत गोपनिय दस्तावेज चोरल्याचा आरोप केला होता. यासंबंधी एका नागरिकाला रशियाने अटकही केली आहे. त्याच्यावर देशद्रोह्याचा आरोप लावण्यात आला आहे. हा अधिकारी मोठ्या पदावर होता आणि त्याने या फाईल्स चीनला सोपविल्या होत्या.
9 / 10
भारतीय सीमेवर घुसखोरी केल्याने गेल्या महिन्यात गलवान घाटीमध्ये हिंसक घटना घडली होती. चीनच्या सैन्याने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे बरेच सैनिक मारले गेले होते. यामुळे चीन सीमेवर युद्धजन्य़ परिस्थिती होती. तर तैवानलाही चीन धमक्या देत होता. चीनच्या या आक्रमकपणामुळे अमेरिकेने चीनच्या समुद्रात मोठमोठ्या युद्धनौका पाठवून युद्धाभ्यास सुरु केला आहे. यामुळे चीन खवळला असून त्याने जगालाच मोठी धमकी देऊन टाकली आहे.
10 / 10
अमेरिका आपला प्रभाव वाढवू लागला आहे. जगाला याचे परिणाम भोगावे लागतील. चीनसोबत क्षेत्रिय वाद असलेल्या सर्व देशांना अमेरिका पाठिंबा देत आहे. याचबरोबर अमेरिका पश्चिमी आणि आशियाई देशांनाही चीनविरोधात भडकवित आहे.चीनचा व्यापार अमेरिकेएवढाच आहे. जवळपास 100 देशांशी चीनचे व्यापारी संबंध आहेत. या संबंधांना अमेरिका खराब करू पाहत आहे. याची किंमत जगाला खूप काळ भोगावी लागणार आहे, अशी धमकी चीनने दिली आहे.
टॅग्स :chinaचीनindia china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखAmericaअमेरिकाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन