शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

India China FaceOff: बर्फाळ भागात चीनच्या मदतीला सहा पायांचा ‘महाकाय’; भारताचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 5:34 PM

1 / 10
चीननं आता बर्फावर स्कीइंग करणाऱ्या रोबोटची निर्मिती करत जगाला आश्चर्यचकीत केलंय. चीनच्या शेनयांगमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. याठिकाणी रोबोट घसरड्या रस्त्यावरुन वेगाने धावत असल्याचं दिसून येत आहे. हा रोबोट भारताची चिंताही वाढवू शकतो
2 / 10
चीनचा दावा आहे की, रोबोट भविष्यात ५ जी तंत्रज्ञानाशी जोडला जाणार असून सीमाभागात गस्त आणि बर्फाच्या पहाडांवर मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी सक्षम आहे. चीनच्या शांघाई जिआओ तोंग यूनिवर्सिटीनं या रोबोटची निर्मिती केली आहे.
3 / 10
स्कीअरचे तंत्रज्ञान समजून घेण्याची क्षमता या रोबोटमध्ये बसवण्यात आली आहे. हे मानवांच्या हालचाली करण्याच्या पद्धतीचे अनुकरण करू शकते. हा रोबोट प्रत्येक स्कीवर एक पाय ठेवून धावतो. बर्फावर त्याची पकड मजबूत करण्यासाठी स्की पोलही बसवण्यात आले. चीनच्या टीमनेही रोबोटचे प्रात्यक्षिक दाखवले आहे.
4 / 10
हा रोबोट गर्दी आणि उतारावर सहजतेने स्की करण्यास सक्षम आहे. त्यातील उपकरणे टक्कर होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. हा रोबोट १८ अंशांच्या उतारावर १० मीटर प्रति सेकंद वेगाने स्कीइंग करताना दिसला. येत्या काळात हा रोबो स्कीइंग स्पर्धेत सहभागी होऊ शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
5 / 10
तसेच या रोबोटच्या मदतीनं डोंगराळ भागात गस्त घालता येणार आहे. संशोधकांनी सांगितले की, 'या रोबोटने धावणे, चालणे, मार्ग तयार करणे आणि मानवांशी संपर्क साधण्याचे काम पूर्ण केले. चाचणी दरम्यान, रोबोटने उच्च प्रमाणात चपळता दर्शविली.
6 / 10
या संपूर्ण प्रकल्पाला चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पाठिंबा दिला आहे. याआधी चीनने चार पाय असलेला जगातील सर्वात मोठा 'रोबोट याक' बनवल्याचा दावा केला होता. चिनी मीडियाचा दावा आहे की हा रोबोटिक याक १६० किलो वजन उचलू शकतो आणि १ तासात १० किमीचा प्रवास करू शकतो.
7 / 10
चीनचा हा 'मशीन याक' भारतीय सीमेवरील डोंगराळ भागात हेरगिरीच्या कारवाया करू शकतो आणि कठीण परिस्थितीतही चिनी सैनिकांना शस्त्रे पुरवू शकतो. चीनच्या सरकारी सीसीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, हा रोबोट ज्याठिकाणी मनुष्याला काम करण्यास समस्या येते त्याठिकाणांसाठी बनवण्यात आला आहे.
8 / 10
हा रोबोट जगातील सर्वात मोठा आणि वजनदार असल्याचा दावा सीसीटीव्ही रिपोर्टनं केला आहे. हा रोबोट प्रौढ व्यक्तीपेक्षा अर्धा उंच आहे. चीनचा दावा आहे की मोठा आकार असूनही तो १६० किलो वजन उचलू शकतो आणि १० किमी प्रतितास वेगाने धावू शकतो.
9 / 10
भारतासोबतच्या १९६२मधील युद्धानंतर भारत - चीन सीमेवर बराच काळ बऱ्यापैकी शांतता होती. मात्र, गत काही वर्षांपासून चीनने पुन्हा एकदा कुरापती काढणे सुरु केले आहे. चीन कधी देपसांग, डोकलाम, अथवा गलवानमध्ये घुसखोरी करतो, तर कधी भारतीय नेत्यांच्या अरुणाचल प्रदेश भेटींवर आक्षेप घेतो.
10 / 10
जून २०२०मध्ये चिनी सैनिकांनी गलवान या ठिकाणी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यामुळे उभय देशांचे सैनिक एकमेकांना भिडले होते आणि त्यामध्ये २० भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. काही चिनी सैनिकही ठार झाले होते.
टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव