India China FaceOff PLA recruits seen crying en route to Ladakh border
India China FaceOff: लडाखमध्ये ड्युटी लागताच चिनी सैनिकांना रडू कोसळलं; फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 7:21 PM1 / 10गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी पूर्व लडाखमधील फौजफाटा वाढवला आहे.2 / 10सीमावर्ती भागातील तणाव निवळण्यासाठी आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये कमांडर दर्जाच्या सहा बैठका झाल्या. मात्र तरीही तणाव कायम आहे.3 / 10गेल्या सोमवारीच दोन्ही देशांच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. काही तास चाललेली ही बैठक निष्फळ ठरली. 4 / 10दोन्ही देशांमधला तणाव वाढला असताना आता चिनी सैनिकांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चिनी सैनिक रडताना दिसत आहेत.5 / 10भारताला लागून असलेल्या भागात तैनात करण्यात आल्यानंतर चिनी सैनिकांना रडू कोसळल्याचा दावा करण्यात येत आहे.6 / 10चीनमधील सोशल मीडियावर सैनिक रडत असल्याचा व्हिडीओ सर्वप्रथम व्हायरल झाला. त्यानंतर तो डिलीट करण्यात आला.7 / 10२० सप्टेंबरला सर्वप्रथम चिनी सैनिकांचा व्हिडीओ व्हायरल झाला. तैवानमधील वृत्तवाहिनीनं २२ सप्टेंबरला याबद्दलचं वृत्त दिलं.8 / 10चिनी सैन्य बसनं फूयांग रेल्वे स्थानकाकडे जात असताना व्हिडीओ चित्रित करण्यात आल्याचं तैवानच्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. 9 / 10चिनी सैनिकांना सर्वप्रथम हुबेई प्रांतातल्या एका लष्करी तळावर जायचं होतं. त्यानंतर त्यांना भारतीय सीमेजवळ करण्यात येणार होतं.10 / 10लष्करी महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या या सैनिकांपैकी पाच जणांनी तिबेटमध्ये सेवा दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications