शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'या' पावलांनंतर चीन बिथरला; भारताला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 4:07 PM

1 / 21
कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, अनेक देश त्याला थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनमध्ये उगमस्थान असलेल्या कोरोना व्हायरसचा जगभरात फैलाव झाला असून, अनेक देश कोरोनाच्या उत्पत्तीसाठी चीनला जबाबदार धरत आहेत.
2 / 21
विशेष म्हणजे चीन अशा काळातही आक्रमकपणा दाखवत असल्यानं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनविरोधात अनेक देशांनी एकी केली आहे. अमेरिका आणि भारतच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया आणि जपानसह बरेच देश आर्थिक महासत्तेच्या जोरावर आक्रमकपणे विस्तार करत असलेल्या चीनविरुद्ध एकवटले आहेत.
3 / 21
जगातील भू-राजकीय परिस्थिती बदलण्याचे संकेत मिळत असल्यानं चीननंही आधीच सावध पवित्रा उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा समावेश करण्यासाठी जी-G 7चा विस्तार करण्याचा प्रस्ताव दिला, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
4 / 21
परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींची दूरध्वनीवर चर्चा झाली आहे.
5 / 21
जी-7 हा कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिकेसह जगातील सात मोठ्या आणि प्रगत अर्थव्यवस्थांचा समूह आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांना जी -12 बनविण्यासाठी जी -7चा विस्तार करायचा आहे
6 / 21
जी -7 मध्ये भारताच्या प्रवेशाबद्दल चिनी माध्यमांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. चीन सरकारचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणा-या ग्लोबल टाइम्सने भारताला सावधानतेचा इशारा दिला आहे.
7 / 21
कोरोना साथीपासून ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या संबंधात कटुता आलेली आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूच्या साथीच्या आंतरराष्ट्रीय तपासणीची मागणी केली, तेव्हा चीनला राग आला. दुसरीकडे मंगळवारी भारताने ऑस्ट्रेलियाशी व्हर्च्युएल बैठक घेतली, ज्यामध्ये व्यापारासह सर्वच क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला.
8 / 21
जी -7च्या विस्तार योजनेला हवा देऊन भारत आगीशी खेळत असल्याचं मत लेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, जी -7च्या विस्ताराची कल्पना भू-राजकीय समीकरणांना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात येत आहे. यात चीनला रोखण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतो आहे.
9 / 21
. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे म्हणून अमेरिका केवळ भारताबरोबरच नाही, तर अमेरिका इंडो-पॅसिफिक रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताला बळकट करायचे आहे.
10 / 21
ग्लोबल टाइम्सने आपल्या संपादकीयात लिहिले आहे की, 'ट्रम्प यांच्या योजनेबाबत भारताची उत्साही भूमिका आश्चर्यकारक नाही. शक्तीच्या महत्त्वाकांक्षेमध्ये भारत बर्‍याच दिवसांपासून जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संघटनांचा भाग होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
11 / 21
अलीकडील काळात सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या जी -7 योजनेला पाठिंबा देऊन चीनलाही संदेश देण्याची भारताची इच्छा आहे. चीनवर दबाव वाढवण्यासाठी भारत अमेरिकेच्या जवळ जात असल्याचंही अनेक राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.
12 / 21
जगातील ब-याच देशांमध्ये चीनविषयी असलेला असंतोष पाहता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अमेरिकेसह जगातील सर्व देशांशी भारताची होती असलेली मजबूत भागीदारी चीनच्या माध्यमांनाही खटकत आहे.
13 / 21
ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, दुस-यांदा मोदी सत्तेत आल्यापासून चीनबद्दलचा भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. चतुर्भूज सामरिक संवाद अर्थात भारत ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्याशी असलेले मित्रत्व आणखी मजबूत करीत आहे.
14 / 21
चिनी वृत्तपत्रामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीचा उल्लेख करण्यात आला आहे. वृत्तपत्राने लिहिले आहे, ट्रम्प यांच्या फेब्रुवारी महिन्याच्या दौ-यात भारत आणि अमेरिकेने सर्वसमावेशक जागतिक सामरिक भागीदारी वाढवण्याविषयी चर्चा केली होती.
15 / 21
म्हणजे भारत इंडो-पॅसिफिक रणनीती अंमलात आणण्यासाठी अमेरिकेला मदत करण्यास तयार आहे. त्या बदल्यात तो अमेरिकेकडे जागतिक शक्ती बनण्यासाठी आणि त्याच्या इतर योजनांमध्ये मदत मागतो.
16 / 21
ग्लोबल टाइम्सने लिहिले, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनामच्या वरिष्ठ अधिका-यांनी मार्चमध्ये दूरध्वनीद्वारे चर्चा केली होती. ही बैठक आयोजित करण्यात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
17 / 21
चार देशांच्या गटबाजीला संस्था म्हणून सादर करण्याचा आणि न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममध्ये यांचा करण्याचा विस्तार करण्याचा मानस आहे. चीनला लक्ष्य करण्याच्या अमेरिकेच्या अनेक योजनांमध्ये भारत सक्रिय सहभागी आहे.
18 / 21
परंतु कोरोनाच्या साथीच्या काळात आणि अमेरिकेची पडझड झाल्यानंतरही चीनच्या सामर्थ्यात व त्याच्या जागतिक स्थितीत कोणतीही घट झालेली नसल्याचंही या लेखात अधोरेखित करण्यात आलं आहे.
19 / 21
चीनविरुद्ध नकारात्मक भूमिका ठेवणा-यांच्या हाती भारतीय रणनीतिकार आणि धोरण-निर्मात्यांचा एक छोटा गट आहे. चीनची दिवसेंदिवस वाढत असलेली ताकद आणि भारत-चीनच्या शक्तींमधील वाढत्या फरकामुळे भारत चीनबद्दल अस्वस्थ आहे.
20 / 21
अमेरिका चीनविरुद्ध भारताचे समर्थन करत आहे. यावरून चीनबद्दलची भारताची सामरिक विचारसरणीही दिसून येते. जागतिक धोरणात्मक परिस्थितीबाबतचा भारताचा निर्णय चीनपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
21 / 21
ग्लोबल टाइम्समधून अखेर भारताला इशाराही देण्यात आला आहे. जर भारतानं चीनला काल्पनिक शत्रू मानून विरोधात भूमिका घेतल्यास चीन-भारत संबंध बिघडतील आणि ते भारताच्या हिताचे ठरणार नाही.चीनी सरकारच्या मुखपत्रात लिहिले आहे, 'दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आधीच तणावग्रस्त आहेत. चीन-भारत संबंध अशा अवस्थेत आहेत की, केवळ देशातील सर्वोच्च नेतेच पुढच्या भविष्याचा निर्णय घेऊ शकतात.
टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी