शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी अमेरिकेच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश बनणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 12:15 PM

1 / 8
अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी यांना न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी नामांकित करण्यात आले आहे.
2 / 8
न्युयॉर्कमधील पूर्व जिल्ह्यातील कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी सरिता कोमातीरेड्डी यांचे हे नॉमिनेशन आहे.
3 / 8
गेल्या सोमवारी (दि.४) राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सरिता यांचे नॉमिनेशन US Senate मध्ये पाठविले, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे.
4 / 8
सरिता कोमातीरेड्डी यांचे कुटुंब भारतीय असले तरी, त्यांचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेत झाले आहे. त्यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदवी घेतली आहे.
5 / 8
कोलंबिया सर्किट जिल्ह्याच्या अपील न्यायालयात तत्कालीन न्यायाधीश ब्रेट कॅव्हानोचे कायदा लिपिका म्हणून सरिता कोमातीरेड्डी यांनी काम केले आहे.
6 / 8
त्या सध्या अटॉर्नी कार्यालय, न्युयॉर्कमध्ये पुर्व जिल्हा न्यायालयात सामान्य गुन्ह्याच्या उपप्रमुख आहेत. जून 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत त्या आंतरराष्ट्रीय नारकोटिक्स आणि मनी लाँडिंगच्या देखील उपप्रमुख होत्या.
7 / 8
त्याआधी 2016 ते 2019 दरम्यान त्यांनी कॉम्प्युटर हॅकिंग आणि बौद्धिक संपत्तीचे समन्वयक म्हणून काम केले आहे.
8 / 8
विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरिता कोमातीरेड्डी यांचे नाव सिनेटकडे पाठविले आहे.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पCourtन्यायालय