शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बायडन यांचे 'चाणक्य' असतील 'हे' भारतीय वंशाचे 'तरुण तुर्क'? निवडणुकीत पार पाडलीय महत्वाची भूमिका!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 09, 2020 7:45 PM

1 / 10
जगातील सर्वात शक्तिशाली देश आणि सर्वात जुन्या लोकशाही राष्ट्रात नुकतीच राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. ज्यो बायडन यांच्या रुपात अमेरिकेला 46वा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. तसेच इतिहासात पहिल्यांदाच कमला हॅरीस यांच्या रुपात एक महिला उपराष्ट्रपतीही मिळाला आहे. आता चर्चा सुरू आहे, ती बायडन यांचे प्रशासन आणि त्यांच्या टीमची. बायडन यांच्या टीममध्ये भारतीय वंशांच्या नागरिकांचीही महत्वाची भूमिका असेल, असे मानले जाते.
2 / 10
संजीव जोशीपुरा - संजीव जोशीपुरा यांचे मुख्य काम बायडन आणि कमला हॅरीस यांच्यासाठी भारतीयांचे समर्थन मिळवणे होते. 'इंडियंस फॉर बायडन नॅशनल काउंसील'अंतर्गत स्थापन झालेल्या 'साऊथ एशियन्स फॉर बायडन' या संघटनेचे अध्यक्ष संजीव जोशीपुरा हे आहेत. या संघटनेचा मुख्य उद्देश हॅरीस यांच्यासाठी सर्व धर्मांच्या भारतीयांचे समर्थन मिळवणे होता. या बाबतीत ते अत्यंत सक्रिय आहेत.
3 / 10
अमित जानी: बायडन यांच्या टीममध्ये अमित जानी हे पॉलिटिकल कॅम्पेनर होते. दक्षिण आशियन कम्युनिटीच्या लोकांना आपल्या बाजूने वळविण्यास ते अत्यंत चानाक्ष आहेत. एढेच नाही, तर अमेरिकेत मतांचे ध्रुवीकरण करण्यातही ते चतूर आहेत. महत्वाचे म्हणजे, अमित जानी हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही समर्थक आहेत.
4 / 10
डॉ. विवेक मूर्ती - राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच, आपली प्राथमिकता कोरोना महामारीला लगाम घालणे असेल, असे बायडन यांनी जाहीर केले आहे. यासाठी ते टास्क फोर्स तयार करतील आणि या टीमची जबाबदारी ते डॉ. विवेक मूर्ती यांना देण्याची शक्यता आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात विवेक हे अमेरिकेचे सर्जन जनरल होते.
5 / 10
विनय रेड्डी - विनय रेड्डी हे ज्यो बायडन यांच्यासाठी भाषण तयार करत होते. यामुळे ते बायडन यांच्या जवळचे आहेत. यांचादेखील बायडन यांच्या टीममध्ये समावेश होऊ शकतो.
6 / 10
सबरीना सिंह - उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या कमला हॅरीस यांनी भारतीय-अमेरिकन सबरीना सिंह यांना प्रेस सचिव म्हणून नियुक्त केले होते. सबरीना यांना अमेरिकेतील राजकारणाची चांगली माहिती आहे.
7 / 10
राज चेट्टी - बायडन यांना आर्थिक मुद्द्यांवर सल्ला देणाऱ्या समितीचे सदस्य राज चेट्टी हेदेखील भारतीय वंशाचेच आहेत. त्यांनाही बायडन यांच्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
8 / 10
यांच्याशिवाय, सोनल शाह, गौतम राघवन, वनीता गुप्ता हे देखील या यादीत आहेत. बायडन यांच्या विजयात यांचाही मोठा वाटा आहे.
9 / 10
उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या कमला हॅरीस.
10 / 10
ज्यो बायडन आणि कमला हॅरीस.
टॅग्स :US ElectionAmerica ElectionJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाIndiaभारत