शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Missile in Pakistan: पाकिस्तान मिसाईल प्रकरण: अमेरिका-रशियामधील दोन अशा घटना, अणुयुद्ध भडकता भडकता राहिलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:23 PM

1 / 11
भारताचे एक वेगवान मिसाईल पाकिस्तानच्या सीमेत जवळपास १२० किमी आत जाऊन पडले. रशिया-युक्रेन युद्धाचे दिवस होते. कोणत्याही क्षणी भारत-पाकिस्तान युद्धाचा भडका उडाला असता. पहिले, दुसरे महायुद्ध असेच सुरु झालेले. एकेक देश आपोआप युद्धात उतरत गेले. ही क्रोनोलॉजी आहे.
2 / 11
या मिसाईलने भारतीय हवाई क्षेत्रात उड्डाण केले, परंतू ते अचानक पाकिस्तानकडे वळले आणि कोसळले. एक वेगवान मिसाईल आपल्याकडे येत आहे, हे पाकिस्तानने डिटेक्ट केल्याचा दावा केला. मनात आले असते तर पाकिस्ताननेही भारतावर मिसाईल डागली असती, असे इशारा इम्रान खान यांनी दिला. परंतू तसे घडले नाही. जगाच्या दृष्टीने ते खूप महत्वाचे होते.
3 / 11
याला पाकिस्तानची निर्णायक भूमिका किंवा भारताला घाबरून शांत बसला असे काहीही म्हणता येईल. परंतू, अणुयुद्ध भडकण्याची दाट शक्यता होती. कारण ते मिसाईल ब्राम्होस हे अण्वस्त्रवाहू होते, असा पाकचा दावा आहे. दुसरी गोष्ट त्यावर अण्वस्त्रे किंवा शस्त्रे लादलेली नव्हती हे फक्त भारताला माहिती होते, पाकिस्तानला नाही.
4 / 11
पाकिस्तानने हा हल्ला भारताने केलेला अण्वस्त्र हल्ला असे मानले असते आणि प्रत्यूत्तर दिले असते तर मोठा अनर्थ झाला असता. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आज अण्वस्त्र संपन्न देश आहेत. पाकिस्तानने खरेच अण्वस्त्र टाकले असते तर...याचे कारण इतिहासातील दोन अशाच घटनांमध्ये लपलेले आहे.
5 / 11
दुसऱ्या महायुद्धानंतर जगावर दोनदा अण्वस्त्र युद्धाचे ढग दाटले होते. परंतू तेव्हाच्या नेते आणि अधिकाऱ्यांच्या तर्कशुद्ध विचारांमुळे अणुयुद्ध भडकता भडकता राहिले होते. हे युद्ध दोन्ही वेळा रशिया आणि अमेरिकेमध्ये होणार होते.
6 / 11
अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये कोल्ड वॉर सुरु झालेले होते. कोणत्याही क्षणी युद्ध भडकेल असा तणाव होता. त्याचवेळी जग अण्वस्त्र हल्ल्याच्या तोंडावर उभे ठाकले होते. अमेरिकेच्या अगदी जवळ क्युबाजवळच्या समुद्रात रशियाची अण्वस्त्रवाहू पाणबुडी दाखल झाली होती. अमेरिकन नौदलाच्या ही बाब लक्षात आली.
7 / 11
सोवियत न्‍यूक्लियर सबमरीनवर अमेरिकेच्या नौदलाने लगेचच डेप्‍थ चार्जेस टाकण्यास सुरुवात केली. डेप्थ चार्जेस म्हमजे छोटी छोटी स्फोटके असतात, ती पाण्यात फुटल्यावर कंपने जाणवतात. असे झाल्यास पाण्याखाली असलेल्या पाणबुडीने वर यावे किंवा आपली ओळख सांगावी, असा प्रघात आहे.
8 / 11
या पाणबुडीमध्ये सोव्हिएत नेव्हीचे अधिकारी वासी अरखीपोव होते. त्यांच्यासोबत अन्य दोन वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना वाटले की अणुयुद्ध सुरु झाले आहे. अमेरिकेच्या युद्धनौकांवर आता अण्वस्त्रांचे टॉर्पिडो सोडायला हवेत. मात्र, यासाठी तिन्ही अधिकाऱ्यांची संमती हवी होती. अरखीपोव यांनी यास नकार दिला आणि अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला होता होता राहिला.
9 / 11
अमेरिका आणि नॉर्वेच्या वैज्ञानिकांना नॉर्दर्न लाईट्सवर संशोधन करायचे होते. त्यासाठी त्यांनी रॉकेट लाँच केले. वैज्ञानिकांनी रशिया, अमेरिकेसह अन्य २८ देशांना याची कल्पना दिली होती. या रॉकेटला अण्वस्त्र हल्ला झाल्याचे समजले जाण्याची शक्यता होती.
10 / 11
यात एक चूक राहिली ती म्हणजे रशियन रडारच्या तंत्रज्ञांना याची माहितीच देण्यात आली नाही. पूर्णपणे अंधारात असलेल्या या तंत्रज्ञांना अमेरिकेने रॉकेट डागल्याचे दिसले. त्यांनी रशियावर हल्ला झाल्याचा मेसेज वरिष्ठांना पाठविला. मॉस्कोला तातडीचा अलर्ट गेला. धावपळ सुरु झाली.
11 / 11
काही मिनिटांत न्‍यूक्लियर ब्रीफकेस रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या टेबलवर आली. बोरिस येल्‍तसिन यांनी संयम दाखविला. रॉकेट ट्रॅक झाले, परंतू त्यांनी हा अण्वस्त्र हल्ला नसल्याचा निर्णय दिला. तिथेच जग दुसऱ्यांदा अण्वस्त्र युद्धापासून वाचले. ही ब्रीफकेस वापरण्याची रशियाची ही पहिलीच वेळ होती.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान