इंडोनेशियात ज्वालामुखी फुटण्याच्या भीतीने दीड लाख लोकांचे स्थलांतर By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 1:34 PM
1 / 7 इंडोनेशियात बाली येथे रिसॉर्ट बेटावर एक ज्वालामुखी कधीही फुटू शकतो, असा इशारा अधिका-यांनी दिल्यानंतर अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. 2 / 7 ४० हजार लोक घाबरून घर सोडून गेले आहेत, तर १ लाख लोकांना येथून नाइलाजास्तव बाहेर पडावे लागत आहे. 3 / 7 ज्वालामुखी फुटण्याच्या इशा-यानंतर स्थानिक लोकात प्रचंड भीती असून पर्यटक असहाय्य स्थितीत फसले आहेत. 4 / 7 माउट आगुंग येथे गत आठवड्यापासून राखाडी रंगाचा धूर निघत आहे. आता तो तीन किमी उंचीपर्यंत निघत आहे. त्यामुळे विमानांचे उड्डाण करणेही अवघड झाले आहे. 5 / 7 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बोर्डाने सांगितले की, ज्वालामुखीतून सातत्याने राख निघत असून, स्फोटाचे आवाजही येत आहेत. आग रात्रीच्या वेळी वाढत असून हे स्पष्ट दिसत आहे की, संभावित ज्वालामुखी स्फोट लवकरच होईल. 6 / 7 माउंट आगुंगमध्ये सप्टेंबरपासून गडगडाट होत आहे. या परिसरात राहणाºया १,४०,००० लोकांना येथून बाहेर पडावे लागले आहे. 7 / 7 आॅक्टोबरपासून ज्वालामुखीची सक्रियता कमी झाल्याने काही लोक परतले होते. मात्र, शनिवारपासून पुन्हा ज्वालामुखीतून आवाज येत आहेत. आणखी वाचा