International Space Station: what-happen-if-international-space-station-fall-on-earth-and-nasa-warns
पृथ्वीवर कोसळणार 4 लाख किलो वजनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? NASA ने दिला इशारा... By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 5:08 PM1 / 7 International Space Station: अंतराळातील रहस्ये शोधण्यासाठी विविध देशांनी मिळून स्पेश स्टेशन अंतराळात पाठवले होते. आता हेच स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता नासाने व्यक्त केली आहे. नासाच्या एरोस्पेस सेफ्टी अॅडव्हायझरी पॅनलने हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर परत आणण्याची तयारी केली आहे. पण, यात थोडासा निष्काळजीपणाही मोठा अनर्थ घडवू शकतो. 2 / 7 रशिया, कॅनडा आणि जपानसह जगातील 20 देशांनी मिळून 1998 मध्ये हे आंतरराष्ट्रीय स्टेशन अवकाशात पाठवले होते. 15 वर्षांसाठी अंतराळात पाठवलेले स्पेश स्टेशन आजही कार्यरत आहे. आता ते पृथ्वीवर परत आणण्याची तयारी सुरू आहे. अंतराळवीर या स्पेस स्टेशनचा वापर अवकाशाशी संबंधित रहस्ये सोडवण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी करतात. यात आतापर्यंत 200 हून अधिक अंतराळवीर गेले आहेत.3 / 7 इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही एक कृत्रिम संरचना आहे, जी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत बसवण्यात आली आहे. याच्या मदतीने पृथ्वीवरुन अंतराळात गेलेले अंतराळवीर विविध प्रयोग आणि संशोधन करतात. हे स्पेश स्टेशन पृथ्वीपासून सुमारे 410 किलोमीटर अंतरावर आहे. 109 मीटर लांब असलेल्या स्पेस स्टेशनचे वजन 4 लाख 50 हजार किलो आहे. हे एका फुटबॉल मैदानाच्या बरोबरीचे आहे. $150 मिलियन खर्चून हे तयार करण्यात आले आहे. 4 / 7 आता प्रश्न पडतो की, हे स्पेश स्टेशन परत का आणले जात आहे. नासाला हे स्पेस स्टेशन आणखी काही वर्षे अंतराळात ठेवायचे आहे, परंतु त्याची देखभाल गरजेची आहे. यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहेत. याशिवाय, अमेरिकन सरकारनेही काही काळापूर्वी अंतराळ बजेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे हे स्टेशन पृथ्वीवर उतरवण्याची तयारी सुरू आहे.5 / 7 नासाचे म्हणणे आहे की, अतिशय सुरक्षितपणे हे स्टेशन पृथ्वीवर उतरवण्याची तयारी केली जात आहे. यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही, मात्र त्याची लँडिंग सोपे नसेल. या प्रक्रियेदरम्यान थोडाही निष्काळजीपणा झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. नासा हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पॉइंट नेमा येथे उतरवणार आहे. हे तेच ठिकाण आहे, जिथे इतर सॅटेलाईट उतरवले जातात.6 / 7 हे अंतराळ स्थानक आकाराने खूप मोठे आहे, त्यामुळे कोणताही निष्काळजीपणा मोठ्या लोकसंख्येला हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे ते खाली आणण्यासाठी नासा एक अचूक योजना आखत आहे. यासाठी नासा स्पेस टगचा वापर करणार आहे. स्पेस टग स्पेस स्टेशनला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न करेल. 7 / 7 स्पेस स्टेशनमध्ये अनेक हायटेक सुविधा आहेत. अशी अनेक उपकरणे आहेत, जी ऑटोमॅटिक काम करतात आणि अंतराळवीरांना अनेक प्रकारची माहिती देतात. हायटेक कॅमेऱ्यांसोबतच त्यात सेन्सर्सही बसवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणातील बदलांविषयी नवीन माहिती मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications