Iran Can attack saudi arebiya easily; America removes anti missile systems hrb
इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 7:32 PM1 / 10सौदी अरेबिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढू लागला असून अमेरिकेने सौदीला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने सौदी अरेबियाला देत असलेली सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2 / 10वॉशिंग्टन पोस्टनुसार कोरोना व्हायरसमुळे तेलाच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे सौदीने तेलाचे उत्पादन वाढविले आहे. यामुळे अमेरिकी कंपन्यांवरही दबाव वाढला होता. गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला तेलाचे उत्पादन कमी करण्यासाठी समजाविण्याचा प्रयत्न केला होता. 3 / 10अमेरिकेने सौदीमध्ये अँटी मिसाईल सिस्टिम आणि काही फायटर जेट तैनात केली होती. इराणपासून सौदीची सुरक्षा करण्यासाठी अमेरिकेने दोन अँटी मिसाईल सिस्टिम ठेवली होती.4 / 10सौदीचे राजे सलमान आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये शुक्रवारी चर्चा झाली. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, दोन्ही नेत्यांनी जागतिक उर्जा बाजारात स्थिरता आणण्यासाठी सहमती दिली होती. मात्र, यामध्ये प्रवक्त्याने अँटी मिसाईल सिस्टिमवर काही वक्तव्य केले नाही. 5 / 10यानंतर सौदीने रशियाला शह देण्यासाठी कच्च्या तेलाची किंमत कमालीची घटविली होती. यामुळे झाले असे की, अमेरिकेच्या कच्च्या तेलाची किंमत शून्य डॉलरपेक्षाही खाली गेली होती. 6 / 10शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी सांगितले की, सौदी अरेबियाच्या अँटी मिसाईल सिस्टिम हटविण्यात येणार आहेत. मात्र, याचा अर्थ असा नाहीय की सौदीची मदत अमेरिका घटवत आहे. 7 / 10पॉम्पिओ यांनी सांगितले की, तेलाच्या किंमतीवरून दबाव बनविण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पॉम्पिओ यांनी पुढे सांगितले की, इराणपासून पुढे धोका नसल्याचेही नाहीय. अँटी मिसाईल सिस्टिमला काही काळासाठीच लावण्यात आले होते. 8 / 10एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, अँटी मिसाईल सिस्टिममागे घेण्याबरोबरच ३०० सैनिकही मागे बोलावण्यात येणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने सौदी अरेबियाच्या मिलिट्रीसोबत सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला होता.9 / 10सौदीवर काही महिन्यांपूर्वीच ड्रोनद्वारे हल्ला झाला होता. सौदीची मुख्य तेल कंपनी उडवून देण्याचा प्रयत्न झाला होता.10 / 10यावर अमेरिकेने हा हल्ला इराणकडूनच झाल्याचा आरोप केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications