शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इराणकडून चलनात मोठा बदल, चार शून्य हटवले अन् नावही बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 2:25 PM

1 / 10
कोरोनाच्या संकटात इराणनं चलनात मोठा बदल केला आहे. इराणनं रियाल हे चलन बदलून तोमान या चलनाला अधिकृत मान्यता दिलेली आहे.
2 / 10
एका तोमानची किंमत ही १० हजार रियाल इतकी असणार आहे. अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इराणच्या चलनाची नेहमीच पडझड होत होती.
3 / 10
चलनातील ही घसरण थांबवण्यासाठी इराणनं थेट चलनच बदललं आहे.
4 / 10
इराण संसदेत चलन बदलासंबंधीचं विधेयक मंजूर करण्यात आलं असून, राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आयएसएनए या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
5 / 10
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरचा करार रद्द केला होता. त्यानंतर इराणवर अनेक आर्थिक निर्बंधही लादले होते. याच कारणामुळे इराणच्या चलनाचे मूल्य ६० टक्क्यांपर्यंत घसरले होते.
6 / 10
इराणी चलनाची किंमत घसरल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तो कमकुवत झाल्याने महागाई वाढली होती.
7 / 10
आता बदललेल्या चलनामुळे सामान्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुद्धा मर्यादित राहतील, असाही दावा केला जात आहे.
8 / 10
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने चलन बदलाचा प्रस्ताव सादर केला. केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.
9 / 10
चलनामधून चार शून्य हटवण्याची चर्चा इराणमध्ये २००८पासून सुरु होती. पण २०१८नंतर या निर्णयाच्या मागणीनं चांगलाच जोर धरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५मध्ये इराणबरोबरच्या अणुकरारामधून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर इराणच्या चलनाचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरू लागले.
10 / 10
अमेरिकेने यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये इराणचे लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केली होती. अमेरिकेने सुलेमानी इराक विमानतळावर असतानाच ड्रोनने त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतर इराण आणि अमेरिकेमधील शत्रुत्व वाढतच गेलं आहे.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिका