शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 3:27 PM

1 / 21
चाबहार प्रकल्पातून भारत बाहेर पडल्याच्या बातमीनंतर आता इराणनं आणखी एका मोठ्या प्रकल्पात एकट्याने पुढे जाण्यााचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प फरजाद-बी ब्लॉक गॅस क्षेत्राच्या विकासासाठी राबवण्यात येत आहे.
2 / 21
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, इराणने सध्या एकट्यानं या गॅस प्रकल्पाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत कालांतरानं या प्रकल्पात सामील होऊ शकेल, असे इराणने म्हटले आहे.
3 / 21
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'फरजाद-बी गॅस फील्ड कराराबाबतही अनेक चर्चा समोर येत आहेत. या प्रकल्पाच्या प्रक्रियेत भारताच्या ओएनजीसी (तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन) कंपनीचा समावेश आहे. पण इराणकडून अचानक धोरण बदलले गेले आहे.
4 / 21
त्यामुळे द्विपक्षीय सहकार्यावर परिणाम झाला आहे. जानेवारी 2020मध्ये इराणनं आम्हाला सांगितले की, भविष्यात इराण हा गॅसफील्ड प्रकल्प एकट्यानं विकसित करेल आणि नंतरच्या टप्प्यावर भारताला सहभागी करून घेतले जाईल. या विषयावर सध्या चर्चा सुरू आहे.
5 / 21
२००९पासून भारत गॅस क्षेत्र विकसित करण्याचे ठेके घेण्याचा प्रयत्न करीत होता. फरजाद-बी ब्लॉकमध्ये २१.३ ट्रिलियन घनफूट वायूचा साठा आहे.
6 / 21
फरजाद-बी ब्लॉक डेव्हलपमेंट, जो पूर्वी इराण आणि ओएनजीसीचा संयुक्त प्रकल्प होता, आता तो स्थानिक कंपनीकडे सुपूर्द केला जाऊ शकतो. इराणशी झालेला अणुकरार संपवून अमेरिकेने त्यावर सर्व प्रकारचे निर्बंध लादले होते, ज्याचा परिणाम इराणमधील भारताच्या प्रकल्पांवरही झाला.
7 / 21
हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा इराण आणि चीन 25 वर्षांसाठी 400 अब्ज डॉलरच्या सामरिक आणि आर्थिक कराराला अंतिम रूप देत आहेत. इराण-चीन सामरिक भागीदारीसंदर्भात इराणच्या संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
8 / 21
चाबहार-जहादान रेल्वे प्रकल्पासाठी होणा-या विलंबाचे कारण देत इराणने भारताला यातून वगळले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत अद्याप या प्रकल्पांबाबत इराणकडून अधिकृत मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे.
9 / 21
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, डिसेंबर 2019मध्ये भारत-इराण संयुक्त आयोगाच्या बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तांत्रिक आणि आर्थिक विषयांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी इराणकडून अधिकृत पक्षाची नेमणूक करण्यात येणार होती. अजून प्रतीक्षा बाकीच आहे.
10 / 21
अलीकडेच इराणचे उपराष्ट्रपती एशाह जहांगिरी म्हणाले की, सरकारने रेल्वे रूळ बांधण्यासाठी राष्ट्रीय विकास निधीतून 300 मिलियन डॉलर्स खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
11 / 21
भारत आणि इराणमधील कराराची स्थिती काय आहे? या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चाबहार रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न आहे, तोपर्यंत भारत सरकारकडून या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी इरकॉन(IRCON)ची नेमणूक केली गेली.
12 / 21
इरकॉन (IRCON) इराणच्या रेल्वे मंत्रालयाच्या सीडीटीआयसी कंपनीत जवळून काम करत होते. इरकॉन (IRCON) ने घटनास्थळाची पाहणी केली होती व त्यासंबंधी अनेक अहवाल तयार केले होते.
13 / 21
त्यानंतर प्रकल्पाच्या इतर बाबींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत इराणच्या आर्थिक अडचणी व आव्हानांवरही चर्चा झाली.
14 / 21
चाबहार प्रकल्प भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पांतर्गत भारत-इराण आणि अफगाणिस्तानदरम्यान सहमती झाली होती. 628 रेल्वे लाइन जहादानला चाबहार ते सीस्तान आणि बलुचिस्तानमार्गे जोडेल.
15 / 21
ओमानच्या आखाती देशातील चाबहार हे इराणचे एकमेव समुद्र बंदर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत 2003 पासून चाबहार प्रकल्पासाठी वचनबद्ध आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2016मध्ये इराण दौर्‍याच्या वेळी हे बंदर अखेर कार्यरत झाले.
16 / 21
त्यानंतर अमेरिकेने इराणवर निर्बंध लावल्यानंतरही बंदर प्रकल्पात बरीच प्रगती केली आहे. 2018पासून एक भारतीय कंपनी चाबहार बंदरचं काम करत आहे आणि बंदरावर जहाजांची हालचाल वेगाने वाढली आहे.
17 / 21
कोरोना विषाणूच्या साथीच्या काळातही चाबहार बंदरावर रहदारी आहे. डिसेंबर 2018पासून आतापर्यंत बंदरात 82 जहाजांची देखरेख करण्यात आली आहे.
18 / 21
त्यापैकी मागील 12 महिन्यांत 52 जहाजे आली आहेत. बंदरात 1.2 दशलक्ष टन माल आणि 8200 कंटेनर आहेत. अफगाणिस्तान आणि पश्चिम आशियासाठी चाबहार बंदराची उपयुक्तता वाढविण्यासाठी सरकारकडून सातत्याने पावले उचलली जात आहेत.
19 / 21
इराण सरकारच्या सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, चाबहार बंदराचा प्रश्न आहे, तोपर्यंत या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि आर्थिक प्रगती होण्यासाठी इराण भारताशी भागीदारी करण्यास कटिबद्ध आहे.
20 / 21
आम्हाला आनंद आहे की कोरोना साथीच्या काळातही चाबहार बंदरातून सामानाची ये-जा कायम आहे. भारताच्या देखरेखीखाली चाबहार बंदरात दिवसेंदिवस भरभराट होत आहे.
21 / 21
आम्हाला आनंद आहे की कोरोना साथीच्या काळातही चाबहार बंदरातून सामानाची ये-जा कायम आहे. भारताच्या देखरेखीखाली चाबहार बंदरात दिवसेंदिवस भरभराट होत आहे.
टॅग्स :IranइराणchinaचीनChabaharचाबहार