शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 1:18 PM

1 / 8
हमासच्या प्रमुखाला देशात घुसून मारले तरीही शांत बसलेला इराण हिजबुल्लाहच्या प्रमुखाच्या मृत्यूनंतर खवळला आहे. मंगळवारी रात्री इस्त्रायलवर इराणने २०० च्या आसपास बॅलेस्टीक मिसाईल डागली आहेत. यापैकी अनेक मिसाईल अमेरिका आणि इस्रायलने पाडली असली तरी काही मिसाईल इस्रायलच्या लष्कराच्या तळांवर पडली आहेत. या हल्ल्यात एका इस्रायली नागरिकाचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने आता मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला आहे. हेच इराण आणि इस्त्रायल देश कधीकाळी जिगरी दोस्त होते, ते आता जानी दुश्मन बनले आहेत.
2 / 8
दक्षिण आशियाई विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक धनंजय त्रिपाठी यांच्यानुसार इराण आणि इस्रायलमध्ये आता एवढी तेढ निर्माण झाली आहे की इस्रायलला अस्तित्वाचा हक्कच राहिलेला नाही, असे इराणला वाटत आहे. इराण इस्रायलला छोटा राक्षस आणि अमेरिकेला मोठा राक्षस मानतो. इराणला हे दोन्ही देश मध्य पूर्वेतून हद्दपार झालेले हवे आहेत.
3 / 8
तर इराण हा हिजबुल्ला, हमास आणि हुती विद्रोह्यांना पैसे देतो असे इस्रायलला वाटत आहे. या दोघांच्या दुष्मनीमध्ये आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. इराणने इस्रायलविरोधात इतर देशांना एकत्र केलेले आहे. इस्रायलच्या अस्तित्वावर उठलेल्या इराणने कधी काळी इस्रायलच्या स्थापनेला पाठिंबा दिला होता.
4 / 8
१९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वीपर्यंत इस्रायल आणि इराणचे संबंध मैत्रीपूर्वक होते. तेव्हा इराणमध्ये पहलवी राजाची सत्ता होती. तेव्हा इराण अमेरिकेचाही एक महत्वाचा साथीदार होता. १९४८ मध्ये जेव्हा इस्रायलची स्थापना झाली तेव्हा त्याला पाठिंबा देणारा पहिला देश तुर्कस्तान आणि दुसरा देश हा इराणच होता.
5 / 8
इस्रायलचे पहिले पंतप्रधान, संस्थापक डेविड बेन गुरियन यांनी अरब देशांशी दोस्ती करण्यासाठी आधी इराणला जवळ केले होते. इस्रायल यहुदी देश असल्याने त्याचे शेजारी मुस्लिम देश होते. यामुळे पुढे अडचण नको म्हणून ही दोस्ती केली गेली होती. परंतू, १९७९ मध्ये अयातुल्लाह खामेनेईनी राजाची सत्ता उलथवली आणि स्वत:ला इराणचा रक्षक घोषीत करत मुस्लिम राज्य स्थापन केले. यामुळे अमेरिका आणि इस्रायलविरोधात खामेनेईंनी देशात वितुष्ट निर्माण केले. याच्या कचाट्यात इतर मुस्लिम देशही आले.
6 / 8
खामेनेईंनी इस्रायलशी संबंध संपविले. आपल्याच नागरिकांना पासपोर्ट देण्यास नकार दिला. तेहरानमधला इस्रायल दूतावास बंद करून पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या ताब्यात दिला. तेव्हा स्वतंत्र पॅलेस्टाईनसाठी इस्रायलविरोधात लढा सुरु होता.
7 / 8
इस्रायल-इराण यांच्यात अशी मैत्री होती की खामेनेई यांनी एवढी कारस्थाने करूनही इस्रायलने इराणसाठी इराकसोबत युद्ध केले होते. १९८० - १९८८ या काळात इराणचे सद्दाम हुसेनच्या इरोकसोबत युद्ध सुरु होते. २२ सप्टेंबर १९८० मध्ये हुसेनच्या सैन्याने इराणवर अचानक हल्ला केला होता. तेव्हा इराणला सगळे विसरून युद्धसामुग्री देणारा इस्रायलच होता.
8 / 8
फक्त युद्धसामुग्रीच नाही तर इराकच्या ओसिरक अणुउर्जा रिएक्टरवर बॉम्बहल्ला करण्यासाठी विमाने पाठविली होती. ते नष्ट केले होते. १९९० पर्यंत इस्रायलने इराणला दुष्मन मानले नव्हते. पण नंतर त्यांच्यात वितुष्ट सुरु झाले. इराणने अण्वस्त्रांसाठी हालचाली सुरु केल्यानंतर त्यांच्यात वितुष्ट सुरु झाले. इस्रायलला आजुबाजुचा कोणताही देश अण्वस्त्रधारी नको होता.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध