iran underground drone base station photos
इराणचा नादच करायचा न्हाय! चक्क डोंगराखालील बोगद्यांमध्ये लपवलेत ड्रोन; पहिल्यांदाच समोर आले PHOTOS By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 10:10 PM1 / 9डोंगराखालील एका बोगद्यामध्ये अत्याधुनिक आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले ड्रोन ठेवण्यात आल्याचं वृत्त प्रसारित करण्यात आलं. इराणीची ही गुप्त मोहिम पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत. (फोटो- AFP)2 / 9इराणमधील जागरोस डोंगराखाली बनविण्यात आलेल्या बोगद्यांमध्ये इराणी सैन्याने खतरनाक ड्रोन्स ठेवले आहेत. इराणचे सैन्य आपले लष्करी सामर्थ्य दाखवण्यासाठी सरकारी माध्यम संस्थेच्या माध्यमातून ही छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत. इराणच्या लष्कराने या अंडरग्राउंड ड्रोन तळाविषयी काही माहिती शेअर केली पण नेमके ठिकाण कोणाला कळवलेले नाही.(फोटो- AFP)3 / 9बोगद्यांमध्ये किमान १०० लष्करी ड्रोन ठेवण्यात आले आहेत. इराणनं याची छायाचित्र प्रसारित केल्यानंतर आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सरकारी माध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार, जाग्रोस पर्वताखाली बांधलेल्या या बोगद्यांमध्ये धोकादायक अबाबिल-5 ड्रोन देखील आहेत. ज्यामध्ये Qaem-5 क्षेपणास्त्रे बसवली आहेत.(फोटो- AFP)4 / 9Qaem-5 ही क्षेपणास्त्रे इराणने विकसित केलेली हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. जे अमेरिकेच्या हेलफायर मिसाईलसारखी धोकादायक आहेत. इराणच्या लष्कराचे कमांडर मेजर जनरल अब्दुलरहीम मौसावी यांनी सांगितले की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सैन्य हे या भागातील सर्वात मजबूत सैन्य आहे. (फोटो- AFP)5 / 9द जेरुसलेम पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेजर जनरल म्हणाले की, आमचे ड्रोन कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी किंवा शत्रूची झोप उडवण्यासाठी पुरेसे आहेत. आम्ही आमचे ड्रोन सतत अपग्रेड करत आहोत. (फोटो- AFP)6 / 9इराणच्या सरकारी माध्यमांच्या टीव्ही रिपोर्टरने गुरुवारी सांगितले की पश्चिम इराणमधील केरमेनशाह येथून 45 मिनिटांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर एक गुप्त भूमिगत ड्रोन बेस स्टेशनवर त्याला नेण्यात आलं. या संपूर्ण प्रवासात त्याचे डोळे झाकले गेले होते. पायथ्याशी पोहोचल्यावर त्याचे डोळे उघडले गेले. (फोटो- AFP)7 / 9टीव्ही फुटेजमध्ये अनेक ड्रोन एका रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये क्षेपणास्त्रे तैनात आहेत. हे बोगदे अनेक मीटर लांब आहेत. ते जमिनीपासून काहीशे मीटर खाली देखील आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने आखातात दोन ग्रीक टँकर पकडले तेव्हा हे उघड झाले. (फोटो- AFP)8 / 9गेल्या महिन्यात ग्रीक सरकारने इराणचा ध्वज घेऊन जाणारे पेगास हे जहाज थांबवले होते. कारण त्यात १९ रशियन क्रू मेंबर्स होते. EU च्या निर्बंधांमुळे ते थांबले होते. यानंतर अमेरिकेने इराणी तेलाची वाहतूक रोखली. (फोटो- AFP)9 / 9Pegas ला नंतर सोडण्यात आले. मात्र त्यामुळे आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. इराण आणि इतर जागतिक शक्तींना अणुकरारावर पुन्हा वाटाघाटी करण्याची इच्छा आहे, ज्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादले होते. (फोटो- AFP) आणखी वाचा Subscribe to Notifications