iranian cleric ayatollah abbas tabrizian says covid 19 vaccine turns people gay
Corona Vaccine : "कोरोना लसीमुळे समलिंगी व्हाल", इराणी मौलवीचा अजब दावा By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 11:48 AM1 / 16जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 107,411,553 वर पोहोचली असून आतापर्यंत 2,351,195 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 / 16कोरोनापुढे अनेक प्रगत देश हतबल झाले असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. 3 / 16कोरोना लसीकरणाला अनेक ठिकाणी सुरुवात झाली असून लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. मात्र कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट्स देखील समोर आले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये लसीबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. 4 / 16काही ठिकाणी लोकांनी कोरोनाचा धसका घेतला असून लस घेण्यास नकार दिला आहे. तसेच कोरोना लसीबाबत अनेक अफवा देखील पसरल्या आहेत. याच दरम्यान आता कोरोना लसीबाबत एक अजब दावा करण्यात आला आहे. 5 / 16इराणमधील एका मौलवीने कोरोना लसीबाबत अजब दावा केला आहे. कोरोनाची लस घेतल्यास व्यक्ती समलिंगी होऊ शकतात असं म्हटलं आहे. अयातुल्ला अब्बास तब्रीजिआन या मौलवीने हा दावा केला आहे.6 / 16टेलिग्राममध्ये आपल्या चॅनेलवर त्यांनी लसीबाबत दावा केला. टेलिग्रामवर या मौलवीचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ज्यांनी करोनाची लस घेतली आहे. अशा व्यक्तिच्या जवळ जाऊ नका. लस घेतल्यामुळे या व्यक्ति समलिंगी झाल्या असल्याचा दावा केला आहे.7 / 16अयातुल्ला अब्बास तब्रीजिआनच्या दाव्यानंतर एलजीबीटी समुदायाच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संघटनांनी या विधानावर संताप व्यक्त केला आहे. एलजीबीटी कार्यकर्ते पीटर टटचेल यांनी मौलवींचा हा दावा म्हणजे कोरोना लस आणि समलिंगी यांना 'सैतान' म्हणून सांगण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे.8 / 16इराण सोडून आलेल्या शेइना वोजोउदी यांनी इराण प्रशासनाच्या अन्य मौलवींप्रमाणेच अयातुल्ला यांनी देखील प्रत्येक गोष्टीला आता लैंगिकतेशी जोडले आहे. इराणच्या या मौलवींमध्ये मानवतेची आणि ज्ञानाची कमतरता असल्याचं म्हटलं आहे. 9 / 16इराणचे मौलवी लोकांमध्ये कोरोना लसीबाबत भीती रुजवण्यासाठी हा अपप्रचार करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. सरकारी प्रशासनातील अनेकांनी फायजरची लस घेतली आहे. मात्र सामान्य नागरिकांना ही लस दिली जात नसल्याचं म्हटलं आहे. 10 / 16इराणच्या काही मौलवींनी कोरोना लसीबाबत वेगवेगळे दावे केले आहेत. इराणमध्ये समलैंगिकता हा गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षा दिली जाते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 16कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्हायरसवर रिसर्च सुरू असून अनेक ठिकाणी संशोधकांना यश आले आहे. मात्र याच दरम्यान कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.12 / 16कोरोनाचाच संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच आता अर्जेंटिनामध्ये व्हायरसचा आणखी एक नवा स्ट्रेन आढळला आहे. रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने अर्जेंटिनामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याची माहिती दिली आहे.13 / 16अर्जेंटिनाचे आरोग्य मंत्री जिनीज गार्सिया यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. या नव्या स्ट्रेनबाबत फारशी माहिती समोर आली नाही. गार्सिया यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तसेच आढळलेला पी1 आणि रिओ डि जनेरोमध्ये आढळलेला पी2 स्ट्रेनदेखील अर्जेंटिनामध्ये आढळले आहेत.14 / 16कोरोनाच्या काळात कोरोना व्हायरस जवळपास हजारवेळा म्यूटेट झाला असल्याचं समोर आलं आहे. मात्र कोरोनाच्या तीन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हे तीन व्हेरिएंट वेगाने संसर्ग फैलावतात.15 / 16ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आढळलेल्या स्ट्रेनचा यामध्ये समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या संसर्गावर लसीचाही परिणाम होत नसल्याचं समोर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.16 / 16कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ही लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचे समोर आल्यानंतर लसीचा वापर थांबवण्याचा निर्णय काही ठिकाणी घेण्यात आला आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications