Iranian Doctor Shirin Rouhani dies while treating Coronavirus patients kkg
सलाम! उपचार करताना डॉक्टर महिलेला संसर्ग झाला; कोरोनाबाधितांची सेवा करत करत प्राण सोडला By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 9:30 PM1 / 11चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूनं सर्वत्र दहशत निर्माण केलीय.2 / 11चीनमध्ये हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोनानं आता इटली, इराणमध्ये धुमाकूळ घातलाय.3 / 11इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत दीड हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय.4 / 11तब्बल २० हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्यानं इराणची अवस्था अतिशय वाईट झालीय.5 / 11कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्यानं इराणमधील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलाय.6 / 11इराणमधील एका महिला डॉक्टरचा रुग्णांवर उपचार करता करताच मृत्यू झालाय. 7 / 11डॉ. शिरीन रुहानी यांचा कोरोनाबाधितांवर उपचार करताना मृत्यू झाला.8 / 11रुग्णांवर उपचार करता करता शिरीन यांची प्रकृती खालावत होती. मात्र तरीही आयव्ही लावून त्या रुग्णसेवा करत होत्या.9 / 11रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्यानं, डॉक्टरांची संख्या कमी असल्यानं शिरीन विविध रुग्णालयांमध्ये फिरत होत्या. रुग्णांवर उपचार करत होत्या.10 / 11आधीच प्रकृती ठीक नसल्यानं शिरीन यांना कोरोनाची लागण झाली. मात्र तरीही त्या रुग्णांवर उपचार करत राहिल्या.11 / 11अखेर शिरीन यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाला. रुग्णसेवेची शपथ घेतलेल्या शिरीन यांनी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची शपथ पाळली. आणखी वाचा Subscribe to Notifications