शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इस्लामाबाद : आंदोलक व पोलिसांमधील संघर्षाला हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 8:42 PM

1 / 4
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाने कारवाई सुरु केली. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
2 / 4
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी बळाचा वापर केला. या कारवाईत एका पोलिसाचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहेत.
3 / 4
सप्टेंबर 2017 मध्ये संमत झालेल्या निवडणूक कायद्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात तहरीक-ए-लब्बैक संघटना रस्त्यावर उतरली आहे. कायदा मंत्री जाहिद हमीद यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
4 / 4
निवडणूक कायद्यात करण्यात आलेल्या बदलांमुळे मोहम्मद पैगंबर यांच्या सर्वोच्चतेला आव्हान देण्यात आल्याचा, या संघटनेचा आक्षेप आहे. पण ही केवळ अनावधानाने झालेली चूक असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तान