Israel-Hamas War: 'Hamas' founded by shaikh ahmad yaseen, whos village bulldozed by Israeli soldiers
इस्रायली सैनिकांनी ज्या गावावर बुलडोजर चालवला, त्याच गावातील मुलाने उभारली 'हमास' By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 3:58 PM1 / 9 Israel-Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Israel-Hamas War) यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू आहे. 'हमास' ही संघटना जगभर प्रसिद्ध आहे. गैर-इस्लामिक देश या संघटनेला दहशतवादी, बंडखोर किंवा अतिरेकी संघटना मानतात. पण, या संघटनेची सुरुवात देशाचे रक्षण करण्यासाठी, शहरांचे संरक्षण करण्यासाठी आणि आक्रमणकर्त्या इस्रायलींना पळवून लावण्यासाठी झाली होती. 2 / 9 ही संघटना स्थापनेपासून इस्रायलच्या विरोधात काम करते. याची सुरुवात पॅलेस्टाईनमधील एका छोट्या गावात जन्मलेल्या शेख अहमद यासीनने केली होती. इस्रायली सैन्याने बुलडोझरद्वारे यासीनचे गाव उद्ध्वस्त केले होते. जाणून घेऊ याच यासीनची संपूर्ण कहाणी...3 / 9 1948 मध्ये इस्रायली सैन्याकडून 500 हून अधिक पॅलेस्टिनी शहरे आणि छोटी गावं बुलडोझने उद्धवस्त करण्यात आली होती. 1936 मध्ये पॅलेस्टाईनच्या अल-जुरा गावात जन्मलेला यासिन त्याच्या कुटुंबासह गाझा पट्ट्यात स्थलांतरित झाला. ज्यावेळेस यासीनच्या गावावर बुलडोझर चालवले, तेव्हा तो अवघ्या 12 वर्षांचा होता. यासीनच्या डोळ्यासमोर त्याचे गाव उद्धवस्त झाले.4 / 9 गाझा पट्ट्यात राहणाऱ्या यासिनने 1959 मध्ये इजिप्तच्या ऐन शम्स विद्यापीठात प्रवेश घेतला. आर्थिक अडचणींमुळे त्याला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहुडच्या प्रभावाखाली तो गाझाला परतला. इस्लामिक अभ्यासक आणि अरबी शिकवण्यासाठी समर्पित यासिन गाझामधील एक धार्मिक नेता बनला.5 / 9 1983 मध्ये शेख यासिनला इस्रायली सैन्याने गाझामध्ये अटक केली आणि भूमिगत संघटना तयार केल्याबद्दल आणि शस्त्रे बाळगल्याबद्दल 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. दोन वर्षांनंतर त्याला कैद्यांच्या अदलाबदलीचा भाग म्हणून सोडण्यात आले. 1987 मध्ये त्याने हमासची स्थापना केली. तो त्यावेळी गाझा स्थित मुस्लिम ब्रदरहूडचा नेता होता.6 / 9 हमास ही एक चळवळ आहे, जिचा अजेंडा आक्रमक इस्रायलला हद्दपार करणे आणि उलथून टाकण्याचा आहे. हमास आणि संपूर्ण पॅलेस्टाईन इस्रायलला आक्रमक देश मानतात. इस्रायलमुळे पॅलेस्टाईन आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 1989 मध्ये यासीनला पुन्हा अटक करण्यात आली आणि 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. यावेळी त्याच्यावर हिंसाचार भडकवण्याचा आणि इस्त्रायली सैनिकाला ठार मारण्याचे आदेश दिल्याचा आरोप होता. 7 / 9 इस्रायल आणि जॉर्डनचे राजे, हुसेन यांच्यात झालेल्या करारानंतर यासिनची 1997 मध्ये सुटका करण्यात आली. यानंतर तो सतत आजारी होता. तुरुंगात त्याला डोळा गमवावा लागला, श्वसनाचे आजार आणि श्रवणशक्ती कमी झाली होती. यादरम्यान, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरूच होता.8 / 9 सप्टेंबर 2000 मध्ये सुरू झालेल्या उठावादरम्यान यासिनने इस्रायलसोबत अनेक युद्धविराम प्रस्तावित केले. वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेममधून इस्रायलने माघार घेण्याची मागणी केली आणि पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांच्या हत्या थांबवण्याचे आवाहन केले. यानंतर इस्रायलने यासीनच्या हत्येचे अनेक प्रयत्न केले. 9 / 9 सप्टेंबर 2003 मध्ये इस्रायली सैन्याने गाझा शहरावर F-16 लढाऊ विमानांनी बॉम्बहल्ला केला होता. या हल्ल्यात यासीन जखमी झाला. नंतर, 22 मार्च 2004 रोजी, सकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना इस्रायलने हेलिकॉप्टर हल्ला केला, ज्यात 9 लोकांसह यासीनचा मृत्यू झाला. आता याच यासीनने सुरू केलेल्या हमास संघटनेने इस्रायलविरोधात युद्ध पुकारले आहे. इस्रायलकडूनही हमासला प्रत्युत्तर दिले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications