Israel Palestain conflict Israel embassy accuses chinese state tv for blatant anti semitism
Israel Palestain Conflict : पॅलेस्टाइनवर हल्ले सुरू असतानाच इस्रायल चीनवर भडकला! म्हणाला... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 12:33 PM1 / 12सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्षाची जगभरात चर्चा सुरू आहे. चीनची राजधानी बिजिंग येथे असलेल्या इस्रायली दूतावासाने एका चिनी टेलीव्हिजनवर घोर यहूदीविरोधी कार्यक्रम प्रसारित केल्याचा आरोप केला आहे. (Israel Palestain conflict Israel embassy accuses chinese state tv for blatant anti semitism)2 / 12इस्रायली दूतावासाने आरोप केला आहे, की सीसीटीव्ही या चीन सरकारच्या टीव्ही चॅनलने, गाझातील एअरस्ट्राइकसंदर्भात एक चर्चेचा कार्यक्रम प्रसारित केला. तो 'घोर यहूदीविरोधी' होता. या कार्यक्रमाविरोधात इस्रायलने चीनसमोर विरोध दर्शवला आहे.3 / 12इस्रायलने, चिनी चॅनलच्या परदेशात प्रसारित होणाऱ्या एका कार्यक्रमावर यहूदी विरोधी भावनेतून काम केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात इस्रायली दूतावासाने ट्विट केले आहे, की 'आम्हाला आशा होती, की 'जगावर यहूदी लोकांचे नियंत्रण आहे' कट-कारस्थान करण्याची वेळ संपली आहे. मात्र, दूर्दैवाने यहूदी-विरोधाने आपला कुरूप चेहरा पुन्हा दाखवला आहे.' इस्रायलने म्हटले आहे, 'आम्ही चीनच्या एका सरकारी टीव्ही चॅनलवर यहूदीविरोधी भावना पाहून स्तब्ध झालो आहोत.' 4 / 12सध्या, इस्रायली दूतावासाच्या प्रश्नावर सांगण्यात आले आहे, की बुधवारी सुट्टीचा दिवस असल्याने, हे स्पष्ट होऊ शकले नाही, की तीन मिनिटांच्या सेगमेंटमध्ये नेमके काय आक्षेपार्ह होते. टीव्ही चॅनल प्रकरणात चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.5 / 12खरे तर, मंगळवारी सीजीटीएन चॅनलवर अँकर झेंग जुनफेंग यांनी प्रश्न केला होता, की इस्रायलला असलेले अमेरिकेचे समर्थन वास्तवात लोकशाही मूल्यांवर आधारित आहे का? यावर काही लोकांचे म्हणणे होते, की अमेरिकेचे धोरण ठरवणाऱ्यांवर अमेरिकेतील श्रीमंत यहूदी लोक आणि त्यांच्या लॉबीचा विशेष प्रभाव आहे. यामुळेच अमेरिकेचे परराष्ट्र धोरण इस्रायलच्या समर्थनार्थ दिसते. 6 / 12अँकर झेंग जुनफेंग यांचे म्हणणे होते, की यहूदी लोक उद्योग-धंदे आणि इंटरनेटच्या जगात बलशाली आहेत. काहींचे म्हणणे होते, की यहुदी लोकांची बलशाली लॉबीही असू शकते? 7 / 12टीव्ही चॅनलच्या अँकरने, आपला कट्टर प्रतिस्पर्धक चीनला मात देण्यासाठी अमेरिका मध्य-पूर्वेत इस्रायलचा वापर करत असल्याचा आरोपही केला. एवढेच नाही, तर अमेरिका अरब देशांना मात देण्यासाठी प्रॉक्सी मोहीम चालवत असल्याचेही या अँकरने म्हटले आहे.8 / 12यासंदर्भात, सीजीटीएन चॅलन चालविणाऱ्या सीसीटीव्ही ब्रॉडकास्टिंगकडून अद्याप कसल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही. चीनमधील हे टीव्ही चॅनल रशियाच्या आरटी टीव्ही चॅनलप्रमाणेच इतर देशांसाठी कार्यक्रमांचे प्रसारण करत असते.9 / 12चीन प्रदीर्घ काळापासूनच पॅलेस्टाइनचा समर्थक आहे. नुकतेच, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इस्रायली हिंसाचाराची निंदा करणारे एक निवेदन जारी करण्यापासून रोखल्यामुळे अमेरिकेला निशाण्यावर घेतले. खरेतर, चीनचे इस्रायलसोबतही राजकीय आणि आर्थिक संबंध आहेत. 10 / 121992 मध्ये इस्रायलसोबत औपचारिक राजकीय संबंध प्रस्थापित केल्यापासून, बिजिंगने इस्रायलसोबत आर्थिक, तंत्रज्ञानात्मक आणि सैन्य संबंध पुढे नेले आहेत. चीनने इस्रायलकडून ड्रोनही खरेदी केले आहेत.11 / 12सुरक्षा परिषदेत इस्रायलच्या हिंसाचाराविरोध निवेदन जारी करू न दिल्याने चीन अमेरिकेवर टीका करत आहे. मानवाधिकारांचा झेंडा घेतलेल्या आणि मुस्लीमांचे शुभचिंतक म्हणवणाऱ्या अमेरिकेला पॅलेस्टाइनमधील मुस्लिमांचीही चिंता असायला हवी, असे चीनने म्हटले आहे.12 / 12अमेरिकेने इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे चीनने म्हटले आहे. पॅलेस्टाइनमधील नागरिकांच्या हत्येने जागतिक आक्रोश निर्माण केला आहे. अमेरिकेचा पक्षपात हा मानवता विरोधी आहे, असे चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications