शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजकुमारीने सामान्य मुलाशी लग्न करण्यासाठी सोडली कोट्यवधीची संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 7:41 PM

1 / 8
जपानमधील राजकुमारी माको एका सामान्य व्यक्तीशी लग्न करून महिलांशी निगडित रूढी मोडत आहे आणि प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीही एक आदर्श ठेवत आहे. दरम्यान, राजकुमारी माकोला एका सामान्य कुटुंबीयातील मित्रासोबत लग्न करायचे आहे आणि त्यासाठी तिने मोठी किंमतही मोजली आहे.
2 / 8
माको जपानचे माजी सम्राट अकिहितोची नात आहे. तिये वय 29 वर्षे आहे. तिचे 2017 मध्ये त्याचा मित्र कोमुरोसोबत लग्न ठरले होते. कोमुरो एका सामान्य कुटुंबातील आहे. कोमुरोच्या कुटुंबातील वादामुळे हे लग्न चार वर्षे रखडले होते. मात्र, एएचके ब्रॉडकास्टरच्या मते, आता हे लग्न ऑक्टोबरमध्ये होऊ शकते.
3 / 8
विशेष म्हणजे, कोणत्याही सामान्य व्यक्तीसोबत लग्न केल्यास राजकुमारी माको हिचा शाही दर्जा समाप्त होईल. हा दर्जा संपल्यानंतर तिला जवळपास एक मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 कोटी रुपये दिले द्यायचे होते, परंतु तिने होणाऱ्या पतीवर झालेल्या टीकेमुळे ते देखील सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
4 / 8
जपान सरकारनेही माको हिच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. जपानी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, लग्नानंतर हे जोडपे अमेरिकेत राहू शकते. दरम्यान, माको आणि कोमुरो महाविद्यालयात एकत्र शिकत होते. कोमुरो अमेरिकेत लॉ कंपनीसाठी काम करतो. कोमुरोने 2013 मध्ये माकोला प्रपोज केले होते.
5 / 8
राजकुमारी माको हिने सुरुवातीच्या काळात आपले रिलेशनशिप अत्यंत खाजगी ठेवले. ब्रिटनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिने 2017 मध्ये जाहीर केले की, ती एका सामान्य माणसाशी लग्न करणार आहे. प्रदीर्घ वादानंतर जपानच्या क्राउन प्रिन्सेस यांनी माको हिच्या लग्नाला होकार दिला.
6 / 8
माकोच्या वडिलांनीही मुलीच्या निर्णयाचा आदर केला आणि तिला स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. विशेष म्हणजे जपानमधील एका सामान्य व्यक्तीशी लग्न केल्यानंतर कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाचा शाही दर्जा संपतो. मात्र, माकोने त्यांच्या नात्यासाठी शाही स्थितीची पर्वा केली नाही.
7 / 8
दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोमुरो हा प्रिन्स ऑफ द सी म्हणून काम करतो. राजकुमारी माको हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, दोघेही एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाहीत.
8 / 8
राजकुमारी माकोच्या आधी, तिची मावशी राजकुमारी सयाकोनेही राजकुमारीची पदवी परत केली आहे. तिने 2005 मध्ये एका टोकियो अधिकाऱ्याशी लग्न केले.
टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटके